*साटक प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या डॉ हिंगे व कर्मचा-याचा सत्कार*
नागपूर कन्हान : – महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभि याना अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा व सोयीसुविधा प्रदान करणा-या साटक प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्काराची नुकतिच घोषणा करण्यात आल्याने डॉ वैशाली हिंगे व सहकर्मीचा ग्रा प आमडी सरपंचा शुभांगी भोस्कर हयानी सत्कार केला.
प्राथमिक आरोग्य केंद्र ला महाराष्ट्र शासनाने कायाकल्प प्रसंशा पुरस्कार ५० हजार रोख पुरस्कारा ची नुकतिच घोषणा करण्यात आल्याने गट ग्राम पंचा यत आमडी सरपंचा तथा अध्यक्षा महिला सरपंचा संघटना पारशिवनी सौ सुभांगी राजु भोस्कर, ग्रा प सदस्य सौ शिला रूपचंद सोनवाने, सचिव मोरे मॅडम, शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख राजु भोस्कर आदीनी पुरस्करांच्या मानकरी डॉ वैशाली हिंगे, आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर सह सहकर्मी यांनी केलेल्या अभुतपुर्व कार्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535