डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वंचित बहुजन आघाडी महानगर चंद्रपूर च्या वतीने साजरी करण्यात आली
आज दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी बोधिसत्व परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार चंद्रपूर शहर महानगर च्या वतीने मान. सतिश खोब्रागडे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील मुख्य पुतळ्याला मल्यार्पण करण्यात आले त्यांनतर चंद्रपूर तालुक्यातील मौजा देवाडा येथील डेबूजी बहुउद्देशीय समाज विकास संस्था, चंद्रपूर “डेबू सावली वृद्धाश्रम ” येथे वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर महानगर च्या वतीने केक कापून वृद्ध महिला व पुरुषांना नास्ता फळाचे वाटप करण्यात आले या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पी. डब्लू. मेश्राम यांचे अध्यक्षते खाली डेबू सावली वृद्धाश्रम येथे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व संत व महापुरुषांच्या संदर्भात विचार व्यक्त करण्यात आले.याप्रसंगी डेबू सावली येथे आश्रित असलेली महिला श्रीमती सुधा मुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक कविता सादर केली.
जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर महानगरचे मा. सतिश खोब्रागडे, मा. पि. डब्लू. मेश्राम, मा. रामजी जुनघरे, मा. सुभाचंद्र ढोलने, मा.सुभाष थोरात, मा.सुमित मेश्राम, मा.ऍड. विपीन रामटेके, मा.ऍड. पुनमचंद वाकडे, मा. दुष्यंत मेश्राम, मा.विष्णू चाफडे,मा.ऍड. किशोर कऱ्हाडे, कुमारी स्वतेजा मेश्राम, मा. संदीप देव, मा. सुनील भसारकर, मा. योगेश इत्यादी कार्यकर्त्या समवेत जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
