गहुहिवरा येथे ग्राम संपर्क अभियान संपन्न. पंजाब नॅशनल बॅके व्दारे मास व सेनीटाझर वितरण.
नागपूर (कन्हान) : – शहरात पासुन ४ किमी लांब गहुहिवरा
गावात पंजाब नॅशनल बॅंक कन्हान शाखेव्दारे आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत गट ग्राम पंचायत खंडाळा अंतर्गत गहुहिवरा येथे ग्राम संपर्क अभियान राबविण्यात आले.
पंजाब बॅक शाखा कन्हान प्रबंधक गोपाल धोंगडी व अशुतोष रामटेके यांनी गहुहिवरा येथील पंजाब नॅश नलचे उपभोक्ता व इतर नागरिकांना मास व सेनीटाझर वितरण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान विमा योज ना, किसान क्रेडिट कार्ड, ट्रॅक्टर व इतर चारचाकी, दुचा की वाहन खरेदी कर्ज, शिक्षण कर्ज, गृहकर्ज, बॅकेचे अँप आदी विषयावर सविस्तर माहितीचे मार्गदर्शन केले. गावकर्यानी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या मांड ल्या. बॅकेचा वतीने सर्व शंका समस्यांचे निराकरण करण्यात आले. स्वेता पटले यांनी बॅंकेचा अन्य योजने सोबत पेशन योजना, आरोग्य बिमा योजना, अपघाती बिमा योजना आदीची माहिती दिली. तसेच बॅकत होणारा भष्ट्राचार व इतर असुविधाजनक परिस्थिती वर वचक बसवण्याची ग्राहकाना हमी दिली. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन व प्रस्तावना आशुतोष रामटेके यांनी केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535