सिनेट परिवर्तन पॅनल ची 4 नोव्हेंबर ला विद्यापीठा समोर नारे निदर्शने
Summary
नागपूर विद्यापीठाद्वारे सिनेट निवडणूकीची घोषणा करण्यात आली. परंतु जुन्या पदवीधर मतदारांचे त्यात बी फार्म भरण्याच्या दृष्टिकोनातून काहीही वेळ न दिल्यामुळे तसेच आक्षेपाची सुद्धा संधी नाकारल्याने *विद्यापीठ कायद्या विरोधी निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबरला दुपारी 11 ते 2 च्या* […]
नागपूर विद्यापीठाद्वारे सिनेट निवडणूकीची घोषणा करण्यात आली. परंतु जुन्या पदवीधर मतदारांचे त्यात बी फार्म भरण्याच्या दृष्टिकोनातून काहीही वेळ न दिल्यामुळे तसेच आक्षेपाची सुद्धा संधी नाकारल्याने *विद्यापीठ कायद्या विरोधी निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबरला दुपारी 11 ते 2 च्या* दरम्यान विद्यापीठ प्रशासकीय भवना समोर (बजाज भवन) नारे व निदर्शने करण्यात येतील. हा निर्णय आज (2.11.22) रविभवनात झालेल्या सिनेट परिवर्तन पॅनल मध्ये समाविष्ट असलेल्या 17 संघटनांनी मिळून एकमताने घेतला. सोबतच स्वबळावर दहाही जागेवर निवडणूक लढून जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
👫आजच्या बैठकीत बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा, सम्यक विद्यार्थी आंदोलन, ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरम, भीम आर्मी, बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन, बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन, प्रहार जनशक्ती संघटना, राष्ट्रीय विद्यार्थी संघ, ट्रायबल फ्रंट, युथ फार सोशल जस्टिस, मागासवर्गीय कर्मचारी संगठना, सार्वभौम युवा मंच आदि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
👬ज्यात माजी सिनेट सदस्यद्वय प्रशांत डेकाटे, शीलवंत मेश्राम, आशिष फुलझेले, अमोल थुल, मुकेश मेश्राम, उत्तम शेवडे, अंकित राऊत, शबिना शेख, सचिन वाघाडे, प्रज्ञावंत माटे, प्रशांत बनसोड, जावेद पाशा, रोहित भगत, निखिल कांबळे, सिद्धांत पाटील, राजेश बोढारे, दीपक जनबंधू, जे बी रामटेके, विश्वास राऊत, नितीन निनावे, प्रतीक गजभिये, सुरेश खंगार, विजय रंगारी, प्रशांत गणवीर आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
🙎🏼♂️बैठक डॉ विनोद रंगारी ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, समारोप आशीष तितरे ह्यांनी केला.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्यूरो
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क चॅनल