हेडलाइन

जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स महिला आघाडीच्या विदर्भ उपाध्यक्षपदी सुनिता आनंद तागवान निवड

Summary

जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स महिला आघाडीच्या विदर्भ उपाध्यक्षपदी सुनिता आनंद तागवान निवड   गडचिरोली / चक्रधर मेश्राम (प्रतिनिधी ) दि. 10/02/2022:-   जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील उच्चशिक्षित असणाऱ्या ड्रेस डिझायनर, ब्युटी कल्चर ,त्याचप्रमाणे लेखिका ,कवयित्री ,सामाजिक कार्यकर्त्या ,लोकमत सखी मंच […]

जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स महिला आघाडीच्या विदर्भ उपाध्यक्षपदी सुनिता आनंद तागवान निवड

 

गडचिरोली / चक्रधर मेश्राम (प्रतिनिधी ) दि. 10/02/2022:-

 

जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील उच्चशिक्षित असणाऱ्या ड्रेस डिझायनर, ब्युटी कल्चर ,त्याचप्रमाणे लेखिका ,कवयित्री ,सामाजिक कार्यकर्त्या ,लोकमत सखी मंच संयोजिका ,व अभिनय नृत्य चित्रकला, पर्यटन यांच्या छंद जोपासणाऱ्या सुनिता आनंद तागवान यांची जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स विदर्भ उपाध्यक्षपदी जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे विदर्भ अध्यक्ष संजीव भांबोरे व विदर्भ महिला आघाडीच्या अध्यक्ष उषा घोडेस्वार यांनी ही नियुक्ती जीवन आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ .शंकर पोवार व प्रतिभाताई पोवार यांच्या विनंतीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे .जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स ही संस्था महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून एनजीओ संस्था आहे. या संस्थेला स्कॉटलंड मार्फत आय .एस. ओ .मानांकन ने सन्मानित केले आहे .या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर ,सांगली ,बेळगाव ,येथे संघटनेच्या माध्यमातून 600 रेस्क्यू फोर्स ची टीम उभी असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे . यांची या एनजीओ संस्थेवर निवड झाल्यामुळे नक्कीच लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील .सुनिता तागवान ह्या मागील चौदा वर्षांपासून जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ती म्हणून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करित आहेत. दुःखी,कष्टी लोकांच्या मदतीला धावून जाणे, त्यांना हवी ती मदत करणे त्यांना आवडते. त्यांनी अनेक महिलांचे प्रश्न घेऊन पोलिस स्टेशन मध्येही जावून त्यांना योग्य न्याय मिळवून दिला आहे. अनेक महिला संघटनांमधे विविध पदावर कार्यरत आहेत ‘क्रांतीज्योती’ या महिला संघटनेच्या त्या अध्यक्षा म्हणून अनेक सामाजिक प्रश्न हाताळले आहेत.

डॉ.अभय बंग सर्च, चातगाव जि. गडचिरोली च्या व्यसनमुक्ती केंद्राशी त्या गेली पाच वर्षांपासून जुळलेले आहेत तसेच तालुका स्तरावर व्यसनमुक्ती केंद्राचे अनेक उपक्रम जसे, जनजागरण रँली,मिटींग,भेट इ. तालुका प्रतिनिधी म्हणून कार्य करित आहे. अनेक दारू विक्रेत्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.कारण गडचिरोली जिल्हा हा दारूमुक्त जिल्हा आहे तरीही बेकायदेशीर रित्या इथे दारूविक्री केली जाते.

यावर्षी २०२१ साली सामाजिक कार्यकर्ती म्हणून ता.कोर्टाच्या पँनलवर नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक लोक अदालत मधे प्रकरणांचा निपटारा करण्यात त्यांचे योगदान आहे.

अनेक सामाजिक रँलीमधे सहभाग असतो. युवारंग या संस्थेशी जुळलेल्या असून या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले आहे. स्वयं रक्तदान समिती गडचिरोली यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबिर आयोजित केली आहेत.

कोरोना काळात खाद्यपदार्थांच्या किट बनवून त्या पाठविण्यात सहकार्य केले आहे. स्वतः आर्थिक मदत करून पायी येणाऱ्या मजुरांना जेवण दिले आहे. पायी येणाऱ्या मजुरांना जेवण देण्यासाठी युवारंग सोबत काम केले आहे. कोरोना काळात गरिबांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात हातभार लागला आहे. पूरग्रस्तांना मदत म्हणून एक ट्रक जिवनावश्यक वस्तू भामरागड येथे पाठवल्या. माझी स्वतःची क्रांतीज्योती महिला संघटन ही संस्था असून मी अध्यक्षा आहे.

गेल्या ३२ वर्षांपासून त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. अनेक समाजप्रबोधन करणारे पथनाट्य सादर केले आहे. तसेच नाटकांत कलाकार म्हणून वाटचाल सुरू आहे. छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच आयोजित अनेक आँनलाईन व लाईव्ह सादरीकरण केले आहे. तसेच तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. नवनवीन कलाकारांना एकत्र आणून त्यांना कलेच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहेत.

दरवर्षी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक वृक्षारोपण कार्यक्रम , लोकमत सखी मंच संयोजिका म्हणून गेल्या ८ वर्षांपासून अध्यक्षपद सांभाळित आहेत. स्रियांनी लग्नानंतर केवळ चूल व मुल हेच न सांभाळता अनेक आवडीच्या क्षेत्रात आपले कलागुण प्रदर्शन केले पाहिजे याकरिता दर महिन्याला एक याप्रमाणे अनेक कार्यक्रम घेतले आहे.

जिल्हास्तरावर कार्यक्रमात सहभाग घेऊन अनेक प्रमाणपत्रे, स्मृती चिन्ह, रोख बक्षिसे, भेटवस्तू मिळविल्या आहेत. जिल्हास्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे.

 

२०२०-८ मार्च ला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सफाई कामगार महिलांचा शाल श्रीफळ व भेट देवून सत्कार केला होता. तसेच महिलांना मार्गदर्शन मिळावे म्हणून स्थानिक अँड. चंद्रकांत दरेकर यांना बोलावले, तेव्हा सुद्धा महिला संघटनांनी माझा उत्तम सामाजिक कार्यकर्ती म्हणून माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.

२०१९ जानेवारी ला नृत्यपरिषद पुणे तर्फे माझा जेष्ठ कलावंत म्हणून सत्कार करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून लेखनाचे काम करित आहेत . सोशल मीडिया वर अनेक लेख फेसबुकवर शेअर केले आहेत. कविता लेखन करते लवकरच त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. कविता लिखाणाचे अनेक प्रमाणपत्रे, सन्मानपत्रे, उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, इ. प्राप्त आहेत. काही निवडक कविता विविध इ.पुस्तकात, प्रकाशित झालेल्या आहेत. भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी यांच्या तर्फे जिल्हा प्रशासक म्हणूनही काम करतात. दोन वर्षे पालक संघाचे अध्यक्ष पद भूषविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *