राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची गडचिरोली शहर कार्यकारणी जाहीर.
Summary
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची गडचिरोली शहर कार्यकारणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव येलेकर जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी,सचिव प्रा देवानंद कामडी जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, चंद्रकांत शिवणकर, महिला संघटक सुधा चौधरी यांनी नुकतीच जाहीर केली आहे. शहराध्यक्ष म्हणून श्रीमती सोनाली पुण्यपवार, […]
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची गडचिरोली शहर कार्यकारणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव येलेकर जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी,सचिव प्रा देवानंद कामडी जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, चंद्रकांत शिवणकर, महिला संघटक सुधा चौधरी यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
शहराध्यक्ष म्हणून श्रीमती सोनाली पुण्यपवार, कार्याध्यक्ष सौ सुंदरा करकाडे , उपाध्यक्ष सौ विमल भोयर, सौ बेबीताई चिचघरे, सचिव सौ अर्चना किरमोरे, सहसचिव सौ अलका गुरनुले, कोषाध्यक्ष प्रा. विद्या म्हशाखेत्री सहकोषाध्यक्ष प्रा. विजया मने, शहर संघटक सौ किरण चौधरी, सौ लता मस्के, संध्या भेंडारे, प्रसिद्धीप्रमुख सौ वंदना चाफले, तर सदस्य म्हणून सौ वर्षा बट्टे , सौ.मिराबाई चोपकर,सौ मंगला कोठारे, सौ पुष्पाताई धंदरे, नीलिमा राऊत ,सौ नम्रता कुत्तरमारे, सौ कुसुम भोयर,सौ ऐश्वर्या लाकडे,सौ नयना चन्नावार ,इत्यादींची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबन तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष सौ कल्पना मानकर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष सौ विजयाताई धोटे, उपाध्यक्षा भावना वानखेडे, विदर्भ प्रदेश संघटिका मंगला कारेकर ,सुनिता उरकुडे तसेच सर्व विदर्भ प्रदेश पदाधिकारी त्याचप्रमाणे राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोली च्या सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रा. शेषराव येलेकर
विदर्भ चीफ ब्यूरो न्यूज नेटवर्कL