आपले सर्वांचे लाडके नेते,राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष मा.खा.श्री.शरद पवार साहेब १७ व १८ नोव्हे.ला चंद्रपूर दौऱ्यावर ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष व आपल्या सर्वांचे लाडके नेते मा.खा.श्री.शरद पवार साहेब बहुदा १७ व १८ नोव्हेंबर २०२१ ला चंद्रपूर दौऱ्यावर येण्याचे निश्चित होत आहे. दि.१७ नोव्हेंबरला गडचिरोली कार्यक्रम आटोपून चंद्रपूर जिल्ह्यात मुल येथे दु ३.३० वा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण तर्फे आयोजित भव्य कायकर्ता मेळाव्यास आद.शरद पवारसाहेब संबोधित करतील,त्यानंतर चंद्रपूरला मुक्काम आणि दि.१८ ला दु १ वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर शहर व चंद्रपूर ग्रामीणच्या आढावा बैठकांना उपस्थित राहून,वणी मार्गे यवतमाळ कडे रवाना होतील.अजून अधिकृत कार्यक्रम निश्चित व्हायचा आहे.परंतु जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आद.पवार साहेबांच्या या दौऱ्याला यशस्वी करण्याबाबत आपापल्या तालुक्यात/शहरात/गावांमध्ये बैठका घेवून तयारीला लागावे.दौऱ्याची तारीख आणि अधिकृत दौरा निश्चित झाल्यावर आपण सर्वांना सूचना देण्यात येईल.