लायन्स क्लबच्या वतीने वृद्धांना अन्नदान व गरजू वस्तूंचे वाटप
Summary
गडचिरोली :- लॉयन्स क्लब गडचिरोली तर्फे लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष लॉ. डग्लस अलेक्झांडर ह्यांच्या वाढदिवसानिमित्य दिं.15 ऑक्टोबर रोजी मातोश्री वृद्धाश्रम,गडचिरोली येथे वृद्धांना अन्नदान व गरजू वस्तूंचे वाटप करण्यात आले. महेश बोरेवार आणि लॉ. सतिश पवार ह्यांच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात […]
गडचिरोली :- लॉयन्स क्लब गडचिरोली तर्फे लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष लॉ. डग्लस अलेक्झांडर ह्यांच्या वाढदिवसानिमित्य दिं.15 ऑक्टोबर रोजी मातोश्री वृद्धाश्रम,गडचिरोली येथे वृद्धांना अन्नदान व गरजू वस्तूंचे वाटप करण्यात आले. महेश बोरेवार आणि लॉ. सतिश पवार ह्यांच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला.
वृद्धाश्रमातील वृध्दांना काय हवं असते? त्यांना हवं असते फक्त प्रेम आणि आपुलकी,आपला थोडासा वेळ,बाकी कोणतीही अपेक्षा त्यांना नसते. हेच कारण साधुन वृद्धांशी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस करण्यात आली. तिथल्या वृद्धांसोबत केक कापुन त्यांना गरजावश्यक वस्तु भेट म्हणुन देण्यात आले तसेच त्यांना अन्नदान करण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रम मध्ये लाईटची पर्याप्त सुविधा नसल्यामुळे लॉ सुरेश लडके यांच्यावतीने दोन सोलर लॅम्प यावेळी वृद्धांसाठी देण्यात आले. ह्यावेळी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष लॉ.परविन भामानी, लॉ. सचिव मंजुषा मोरे, कोषाध्यक्ष लॉ. महेश बोरेवार, झोन चेअरपर्सन लॉ. शेषराव येलेकर, लॉ. सतिश पवार,लॉ. डॉ. सुरेश लडके, लॉ. नादिरभाई भामानी, लॉ. शालिनी निंबार्ते आदि सदस्य उपस्थित होते.
शेषराव येलेकर
विदर्भ चीफ ब्यूरो,
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
