कांन्द्री येथुन चारचाकी सुमो वाहन चोरी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत चोऱ्यांचा गुन्ह्यात मोठ्या प्रमाणे वाढत होत असुन कांन्द्री येथे एका अज्ञात आरोपीने चारचाकी सुमो वाहन चोरी केल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१३) जुलै २०२१ ला रात्री २:३२ वाजता दरम्यान फिर्यादी राजेश शर्मा वय ४४ वर्ष राह. कांन्द्री हा रात्री घरी झोपला असता कुणीतरी अज्ञात आरोपीने यांचा फायदा उचलु न घरा समोर ठेवलेली चारचाकी टाटा सुमो वाहन क्र एम एच ३१ एफ सी ३२४५ किंमत २,५०,००० रुपया ची चारचाकी वाहन चोरून नेले. दुसऱ्या दिवशी फिर्या दी राजेश शर्मा सकाळी उठुन घरा बाहेर समोर येऊन पाहतो तर चारचाकी सुमो वाहन न दिसल्याने फिर्यांदी यांनी या घटनेची माहिती कन्हान पोलीसां ना दिली असता पोलीसांनी घटनास्थळावर पोहचुन सीसीटीवी कैमरेची पाहणी केली. सदर प्रकरणी फिर्यादी राजेश शर्मा यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र / २०२१ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून सीसीटीवी कैमरे च्या मद तीने आरोपीचा शोध सुरु केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमितकुमार आत्राम हे करित आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535