आशा व गटप्रवर्तकांच्या १५ जूनपासून राज्यव्यापी संपानिमित्त भंडारा जिल्हा परिषद समोर धरणे व कामबंद आंदोलनाचे आवाहन
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता
:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी १५ जूनपासून राज्यव्यापी संपाच्या आवाहनानुसार दि . १५ जून २०२१ ला भंडारा जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले . आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष कॉ . शिवकुमार गणवीर , संघटक कॉ . राजू बडोले , कॉ . आशिषा मेश्राम , कॉ . सुनंदा दहीवले , कॉ . भुमिका वंजारी व आयटकचे जिल्हा सचिव कॉ . हिवराज उके यांनी केले .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जिवावर उदार होवून काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या , तत्पूर्वी आशांना १८ हजार व गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये किमान वेतन द्या , ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता द्या व २ हजार रुपये वाढ द्या . कोव्हिड कामात मृत्यू झाल्यास वारसांना ५० लाखाचा विमा कवच द्या , पोलिओ , कुष्ठरोग , क्षयरोग व सांसर्गिक रोग इ . कामाच्या सर्व्हेक्षणाचा थकित मोबदला द्या इ . २० मागण्यांचा समावेश आहे . सदर मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पानझाडे यांना देण्यात आले . आशा व गटप्रवर्तकांच्या राज्यव्यापी संपाबाबत बोलतांना कॉ . शिवकुमार गणवीर म्हणाले , जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोव्हिड -१ ९ कामाचा बहिष्कार करण्यात येईल . तसेच संपाबाबतचे तालुकास्तरावरचे निवेदन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दि . १७ जून ला साकोली , १८ ला पवनी व लाखांदूर , १९ ला लाखनी व भंडारा ला देण्यात येईल. सदर निवेदन कॉ . शिवकुमार गणवीर , कॉ . राजू बडोले व कॉ . हिवराज उके यांच्या नेतृत्वात देण्यात येणार आहे .
राजेश उके
सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार:-9765928259
