महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे – उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना अध्यक्ष अजित पवार भालाफेक सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्रा याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Summary

मुंबई, दि. ७ :- “टोकियो ऑलिंपिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रानं आज इतिहास रचला आहे. सुवर्णपदकासोबत देशाचा गौरव वाढवला आहे. कोट्यवधी […]

मुंबई, दि. ७ :- “टोकियो ऑलिंपिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रानं आज इतिहास रचला आहे. सुवर्णपदकासोबत देशाचा गौरव वाढवला आहे. कोट्यवधी देशवासियांची मनं जिंकली आहेत. त्याच्या कामगिरीनं ऑलिंपिक सुवर्णपदकाचा दुष्काळ आज संपला आहे. देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झालेय. नीरज चोप्राचं मन:पूर्वक अभिनंदन”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, नीरज चोप्रानं भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकानं पदकतालिकेतंच नव्हे तर जागतिक क्रीडाविश्वात भारताचा गौरव वाढला आहे. नीरज चोप्राचं सुवर्णपदक मैदानीखेळांकडे पाहण्याचा देशवासियांचा दृष्टीकोन बदलेल. मैदानी खेळांना लोकप्रियता, वलय मिळवून देईल. भारतीय युवकांना मैदानी खेळांकडे वळण्यासाठी प्रवृत्त करेल. नीरज चौप्राचं सुवर्णपदक त्याच्या सातत्यपूर्ण, कठोर मेहनतीचं यश आहे. नीरज चोप्राचं, त्याच्या सहकाऱ्यांचं, प्रशिक्षक, मार्गदर्शक, चाहत्यांचंही सुवर्णपदकाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी नीरज चौप्राच्या सुवर्ण कामगिरीचं कौतुक करुन अभिनंदन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *