महाराष्ट्र हेडलाइन

सी डी सी सि बँकेकडून कर्जदार कर्मचारी यांना दिलासा

Summary

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अंतर्गत वेतनधारी कर्मचारी तथा शिक्षक यांच्या यांच्या माहे मार्च 2021 च्या वेतानातून मार्च 2021 या एकच महिन्याची कर्जाच्या हप्ताची कपात करण्यात यावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे […]

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अंतर्गत वेतनधारी कर्मचारी तथा शिक्षक यांच्या यांच्या माहे मार्च 2021 च्या वेतानातून मार्च 2021 या एकच महिन्याची कर्जाच्या हप्ताची कपात करण्यात यावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या कडे एका निवेदन द्दारे केली होती. त्या निवेदनाची बँकेचे अध्यक्ष यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हातील शाखा व्यवस्थापक यांना मार्च 2021 च्या वेतनातून केवळ मार्च 2021 चे कर्ज हफ्ते वेतनातून कपात करण्याचे निर्देश दिले आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व खाजगी शाळेचे शिक्षक बँकेचे वेतनधारी खातेदार आहेत. त्यामुळे त्यांनी दरमहा मिळणाऱ्या वेतनाच्या आधारावर आपल्या बँकेतून कर्ज घेतले आहेत. परंतु जिल्हा परिषद व शासनाकडून वेळेवर वेतन होत नाही. त्यामुळे कर्जाचे हफ्ते थकीत होतात. मग बँकेकडून SI- Transaction पद्धतीने एकाच महिन्याच्या पगारात दोन, तीन महिन्याचे कर्जाचे हप्ते एकाच महिन्याच्या वेतनातून कपात केल्या जातात. त्यामुळे अनेक कर्मचारी व शिक्षकांना घर खर्च करण्यासाठी त्याच्या खात्यावर रक्कम शिल्लक राहत नाही. त्यामुळे कर्मचारी व शिक्षक हे संघटनेकडे धाव घेतात व संघटनेचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने बँक अध्यक्ष व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन करून विनंती करावी लागते. माहे मार्च -2021 चे वेतन पुढील आठवडय़ात जिल्हा शाखेत जमा होणार आहेत. अशा परिस्थितीत आपल्या जिल्हा मुख्यालयातून माहे मार्च 2021, एप्रिल 2021 या सलग दोन महिन्याचे हप्ते कपात केले जाईल. माहे फेब्रुवारी 2021 च्या वेतनातून कर्मचारी व शिक्षक यांच्या वेतानातून आयकर कपात झाल्यामुळे त्यांना आतापर्यंत खूपच काटकसर करून खर्च करावे लागले तसेच कोरोना महामारीत अनेक जण बाधित झाल्यामुळे हॉस्पिटल चा खर्च करावे लागले त्यामुळे ही वस्तूस्थिती पाहता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी, चं. जि. म. स. बँक यांना व जिल्हातील सर्व शाखा व्यवस्थापक यांना लेखी निर्देश देऊन मार्च 2021 च्या वेतनातून एक महिन्याचे कर्ज हप्ते कपात करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत व बँकेने परिपत्रक सुद्धा निर्गमित केल्यामुळे जिल्हा परिषद मधील सात हजार वेतनधारी कर्मचारी यांना फायदा होणार असून कर्मचारी व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.असे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र रायपुरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *