महाराष्ट्र हेडलाइन

सट्टा किंग जाकीर हुसैन अनवर हुसैन तुरक यांची अवैद्यरित्या सुरू असलेली सट्टा-पट्टी कायमची बंद करून कायदेशीर कारवाई करा

Summary

         पोलीस स्टेशन दुर्गापूर च्या ठाणेदार मा.लता वडिले यांना निवेदन देऊन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )उपतालुका प्रमुख शार्दुल गणवीर यांची मागणी.          शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख मा.श्री.संदीप गीऱ्हे यांच्या मार्गद्शनाखाली दुर्गापूर परिसरातील […]

         पोलीस स्टेशन दुर्गापूर च्या ठाणेदार मा.लता वडिले यांना निवेदन देऊन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )उपतालुका प्रमुख शार्दुल गणवीर यांची मागणी.

         शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख मा.श्री.संदीप गीऱ्हे यांच्या मार्गद्शनाखाली दुर्गापूर परिसरातील सट्टा किंग जाकिर हुसैन अनवर हुसैन तुरक यांची अवैद्य रित्या सुरू असलेली सट्टा पट्टी कायमची बंद करावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली. दुर्गापूर परिसरातील सट्टा किंग जाकीर हुसैन अनवर हुसैन तुरक हा मागील काही वर्षांपासून अवैद्यरित्या सट्टा पट्टी चा व्यवसाय जोमाने करत असून त्याचेवर पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे अनेक गुन्हे दाखल आहेत.तरी सुध्दा पोलिसांना न जुमानता मुजोरीने सट्टा-पट्टी चा धंदा करत आहे.त्याचे सट्टा दुकानात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सततचा वावर असल्याने सभोवतालच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तसेच शालेय विद्यार्थी हे सुध्दा सट्टा-पट्टी चे आहारी गेले असून त्यांचे शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने सट्टा किंग जाकिर हुसैन अनवर हुसैन तुरक, यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करून सट्टा पट्टी कायमची बंद करावी. अशी मागणी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपतालुका प्रमुख शार्दुल गणवीर,युवासेना उपजिल्हाधिकारी सुमित अग्रवाल, युवतिसेना उपजिल्हाधिकरी विपश्यना मेश्राम,युवासेना उपशाखा प्रमुख सागर धनकसार, ॲड-रवी धवन, ग्राम पंचायत दुर्गापूर उपसरपंच प्रज्योत पुणेकर, ग्राम पंचायत दुर्गापूर सदस्या वर्षा रत्नपारखी, ग्राम पंचायत दुर्गापूर च्या माजी सदस्या सपना गणवीर,महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष. धीरज दुर्योधन, शामकला मेश्राम,किरण बंबोळे,मंदा मेश्राम, पपीता जुनघरे,शिवसैनिक दीपक सातपुते, राजकिरन चौधरी,दिवाकर खरोले,रोहित खरोले,सामाजिक कार्यकर्ते एस. कुमार.सोनटक्के, रिझवान कुरैशी,गजानन सावले,अर्जुन सिंग,व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *