संकल्पच्या विलगीकरण केंद्रावर जागतीक परिचारीका दिवस साजरा
नागपूर दिनांक 12 मे : पोलिस योद्धा न्यूज़ नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
जागतीक परिचारीका दिवसाचे निमीत्ताने संकल्प संस्थे व्दारा संचालीत उत्तर नागपूरातील विलगीकरण केंद्रावर डॉक्टर व परिचारीका यांना सुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
कोरोना काळा मध्ये डॉक्टर आणि परिचारीका आज देवदूत बनून रुग्णांची सेवा करित आहेत आणि स्वत:चा जिव धोक्यात घालून रुगणांना जिवनदान देत आहेत. त्यांच्या या कार्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याच्या यथोचीत गैरव करण्यासाठी आज संकल्पच्या तीनही विलगीकरण केंद्रावर कार्यरत परिचारीका यांना पुष्प आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
संकल्पच्या इस्लामीक कल्चर सेंटर येथील विलगीकरण केंद्राला मा. श्री. विनोद राऊत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुगणाल्य व अनुसंधान केंद्राचे वैघकीय अधिक्षक श्री. रवि चव्हान यांनी भेट देऊन पाहणी केली व उपस्थिती परिचारीका यांना पुष्प व प्रश्स्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या त्यानंतर गुरुनानक भवन, गुरुनानकपुरा अशोक नगर येथील केंद्राची पाहणी करुन सदर केंद्रावरील उपस्थिती परिचारीकांचा शुभेच्छा देऊन गौरव केला.
गुरुनानक भवन, गुरुनानकपुरा अशोक नगर येथील केंद्रावर गुरुनानक दरबार कमेटी चे पदाधिकारी श्री खुशकवल सिंग यांच्या हस्ते सदर केंद्रावरील उपस्थिती परिचारीकांचा पुष्प व शुभेच्छापत्र देऊन गौरव करण्यात आला. संकल्पच्या कपिलवस्तु बुध्दविहार येथील विलगीकरण केंद्रावर कपिलवस्तू बुघ्दविहार कमेटीचे अघ्यक्ष श्री. तुषार नंदागवळी यांच्या हस्ते उपस्थिती परिचारीकांचा पुष्प व शुभेच्छापत्र देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष श्री. कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात उपरोक्त कार्यक्रमाचे संयोजन स्विय सहाय्य्क श्री. ललीतकुमार बारसागडे व श्री. संकेश रामराजे यांनी केले. या वेळी श्री राकेश ईखार, श्री पंकज नगरारे उपस्थित होते. या उपक्रमाबाबत आपली भुमीका मांडतांना श्री कुणाल राऊत म्हणाले कि आजच्या घडीला वैघकिय श्रेत्रातील कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा देत आहेत त्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्या कार्याचा यथोचीत सन्मान करणे हे प्रत्येक नागरीकाचे आघ्य कर्तव्य आहे. या निमीत्ताने उत्तर नागपूरातील जनतेकरिता सुरु करण्यात आलेल्या वरिल तीनही विलगीकरण केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
श्री राकेश ज्ञानहर्ष
नागपुर
विभागीय प्रमुख संवाददाता
8484874218