शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या – हरिभाऊ बागडे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसंदर्भात मतदारांना आवाहन

सिल्लोड (प्रतिनिधी) दि 16,
शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
सिल्लोड येथे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना पक्ष जनसंपर्क कार्यालयात दि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.औरंगाबाद संचालक मंडळ निवडणुकीसंदर्भात सोशल डिस्टनसिंग चे नियम पळून ठराविक मतदारांसोबत बैठक संपन्न झाली. यावेळी श्री हरिभाऊ बागडे बोलत होते.
गेली पाच- सहा वर्षे बँकेत एकोप्याने काम केल्याने बँकेला नफ्यात ठेवले आहे. सर्व व्यवहार पारदर्शक ठेऊन बँकेला पुढे नेण्याचाच प्रयत्न केला असल्याचे मत श्री हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. यावेळी रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार , आ.अंबादास दानवे,माजी आ. नितीन पाटील, अभिजीत देशमुख आदींनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी अर्जुन पाटील गाढे, डाँ.सतीष गायकवाड, आण्णासाहेब माने, अंकुश रंधे, मनोज राठोड, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, दामुआण्णा नवपुते, केशवराव पाटील तायडे, देविदास लोखंडे, राजेंद्र ठोंबरे, डाँ. संजय जामकर, काकासाहेब राकडे,अब्दुल अजिज, दामुआण्णा गव्हाणे, शेख सलिम, लक्ष्मण गव्हाणे, अब्दुल रहिम, बाळु शेठ जाधव, जयराम चिंचपुरे, अजिज बागवान, मधुकर बर्डे, महम्मद पटेल, युसूफमिया देशमुख, यांच्यासह मतदारांची उपस्थिती होती.
पाेलिस योद्धा न्यूज नेटवर्क
मराठवाडा
शेख चांद
सिल्लोड