राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; साडेतीन कोटी रुपयांच्या निधीला सार्वजनिक आरोग्य विभागाची अर्थसंकल्पात मंजुरी
Summary
सिल्लोड, (प्रतिनिधी ) ता.10, औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी 3 कोटी 31 लाखांच्या निधीला सार्वजनिक आरोग्य विभागाने अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा अनेक दिवसापासून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू […]
सिल्लोड, (प्रतिनिधी ) ता.10, औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी 3 कोटी 31 लाखांच्या निधीला सार्वजनिक आरोग्य विभागाने अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा अनेक दिवसापासून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्या ठिकाणी सुसज्ज आणि अत्याधुनिक रुग्णालयाची इमारत बांधण्याचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस आहे. त्या इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रयत्न करत होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालय रुग्णालयाच्या इमारतीत 3 कोटी 31 लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
औरंगाबाद – जळगाव महामार्गावर अनेक अपघात होतात. या अपघातातील जखमींना योग्य वेळी इलाज न मिळाल्याने त्यातील अनेक जखमींना प्राणही गमवावे लागतात. मात्र अजिंठ्यात अत्याधुनिक आणि सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची इमारत लवकरच उभी राहणार आहे. त्यामुळे अनेक जखमींचे प्राण वाचण्यात या ग्रामीण रुग्णालय यामुळे मदत होणार आहे.
पाेलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड
शेख चांद