राजश्री छत्रपती शाहु महाराजांना सार्वजनिक वाचनालय तफ्रे अभिवादन
*नागपूर* कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे राजश्री छत्रपती शाहु महाराज यांचा पुण्यदिनी कोरोना काळातील शासनाच्या नियमाचे पालन करून राजश्री छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
गुरूवार (दि.६) मे राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या पुण्यदिनी सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक शासनाच्या नियमाचे पालन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधरराव अवचट, प्रमुख अतिथी पत्रकार कमलसिंह यादव यां च्या हस्ते राजश्री छत्रपती शाहु महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. उपस्थितांनी राजश्री छत्रपती शाहु महाराज यां च्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून दोन मिंनटाचे मौन धारण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करित अभि वादन करण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांचे ताप मान व ऑक्सीजन लेवल तपासण्यात आली. याप्रसं गी अध्यक्ष गंगाधरराव अवचट, अतिथी पत्रकार कमल सिंह यादव, सचिव मनोहर कोल्हे, कोषाध्यक्ष दिनकर राव मस्के, गजेंन्द्र गिरडकर, पुष्पाबाई बर्लेवार, अल्का बाई कोल्हे, श्याम बारई ग्रंथपाल सह नागरिक उपस्थि त होते. सुत्रसंचालन सचिव मनोहर कोल्हे यांनी तर आभार श्याम बारई यांनी व्यकत केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क