योग्य व्यक्तिमत्व घडण्यात शिक्षकाचे मोलाचे योगदान.. सरपंच शरद माकडे….
Summary
प्रवीण मेश्राम उत्तर नागपुर प्रतिनिधीनागपुर : वयाच्या पाचव्या वर्षापासून शिक्षण घेत असलेल्या अपरिपक्व विद्यार्थ्याला योग्य दिशेने यशस्वी होण्याकरता शिक्षका चे मोलाचे योगदान असून शिक्षण क्षेत्रातील प्रगती हीच जीवनाचे यशस्वी वाटचाल असते असे प्रतिपादन ग्रामपंचायत कवठा चे सरपंच शरद माकडे यांनी शिक्षक […]
प्रवीण मेश्राम उत्तर नागपुर प्रतिनिधी
नागपुर : वयाच्या पाचव्या वर्षापासून शिक्षण घेत असलेल्या अपरिपक्व विद्यार्थ्याला योग्य दिशेने यशस्वी होण्याकरता शिक्षका चे मोलाचे योगदान असून शिक्षण क्षेत्रातील प्रगती हीच जीवनाचे यशस्वी वाटचाल असते असे प्रतिपादन ग्रामपंचायत कवठा चे सरपंच शरद माकडे यांनी शिक्षक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले याप्रसंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आनंदन नगर मसाळा टोली जगदंबा नगर शकूर नगर गोविंदगड येथील अंगणवाड्यांना शिक्षक दिनानिमित्त 14 वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत मार्फत अलमारी टेबल-खुर्च्या लहान मुलांच्या बसण्याच्या व्यवस्थेसाठी प्रत्येकी पंधरा खुर्च्या दिल्या कार्यक्रमाला प्रामुख्याने सरपंच शरद माकडे सदस्य नम्रता इंगोले धर्मराज आहाके जी प प्र शाळा कवठा शिक्षक नितीन रायबोले सुरेश ढोरे गोपाल झिंगरे श्रीराम डबले सिद्धार्थ वाघमारे अंगणवाडी सेविका सविता शास्त्री संगीता बिसेन निशा खेरो वैशाली देऊळकर आदी उपस्थित होते.