औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद विमानतळावर स्वागत

Summary

औरंगाबाद, दि.12 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक दिवसीय दौऱ्यासाठी आज दुपारी औरंगाबाद येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.   याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयो […]

औरंगाबाद, दि.12 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक दिवसीय दौऱ्यासाठी आज दुपारी औरंगाबाद येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.

 

याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने , महावितरणचे डॉ. मंगेश गोंदावले, लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांसमवेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचेही आगमन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *