मंगळवेढा तालुक्यात बुधवारी तीन कोरोनाचे रुग्ण सापडले
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे चित्र दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. मागील दहा दिवसात शहर-जिल्ह्यात 100 च्या सरासरीने एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे 20 रुग्णांचा कोरोनामुळे या काळात मृत्यू झाला आहे. बुधवारी एकाच दिवसात शहरात 41 तर ग्रामीण भागामध्ये 115 रुग्ण आढळले आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात बुधवारी तीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहराबरोबर ग्रामीण भागातही काळजी घेणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे बुधवारी अक्कलकोटमध्ये चार, बार्शीत 16, करमाळ्यात 14, माढ्यात नऊ, माळशिरसमध्ये 30, मोहोळमध्ये 12, उत्तर सोलापुरात दोन, पंढरपुरात 20, सांगोल्यात एक आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात चार रुग्ण सापडले आहेत
सोलापूर शहरात मंगळवार पेठ, सहवास नगर, उत्कर्ष नगर, विश्वकरण पार्क (जुळे सोलापूर), साई बाबा चौक, मंत्रीचंडक (होटगी रोड), पाटील नगर (हैदराबाद रोड), वृंदावन सोसायटी (सम्राट चौक), कविता नगर, न्यू पाश्चा पेठ, अशोक चौक, दक्षिण कसबा (जैन मंदिराजवळ),
कित्तूर चन्नम्मा नगर (सैफुल), उत्तर कसबा, अवंती नगर (मुरारजी पेठ), शिवाजीनगर (पूना रोड), रविवार पेठ, उत्तर सदर बझार, मार्कंडेय नगर (कुमठा नाका), दमानी नगर, उमा नगरी, पापाराम नगर (विजयपूर रोड), ट्विंकल शाळेजवळ (जुळे सोलापूर), मोदीखाना मशिदीजवळ, चंद्रलोक नगर, कृषी नगर (विकास नगर), मेहता रेसिडेन्सी (आरटीओ कार्यालयाजवळ) आदित्य नगर,
इंदिरानगर, सिटीझन पार्क (विजयपूर रोड), कोनापूरे चाळ (रेल्वे लाईन), जवळकर वस्ती (सम्राट चौक), अक्कलकोट रोड, विडी घरकूल, करवे नगर (देगाव) आणि शिवगंगा चौक (नेताजी शाळेसमोर) या ठिकाणी नवीन रुग्ण आढळले आहेत.
सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750