महाराष्ट्र हेडलाइन

प्रा.आ.केंद्र मांडवा वाटर फिल्टर चे,उप केंद्र धानोली येथे ऍटोम्याटीक सॅनिटायझर मशीन चे लोकार्पण

Summary

माजी आमदार संजय धोटे यांची उपस्तिथी कोरपना तालुका हा आदिवासीं दुर्गम भागात आदरणीय सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन वन व माजी पालक मंत्री चंद्रपूर तथा लोकलेखा समिती प्रमुख याच्या संकल्पनेतून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारचे सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त्याने […]

माजी आमदार संजय धोटे यांची उपस्तिथी
कोरपना तालुका हा आदिवासीं दुर्गम भागात आदरणीय सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन वन व माजी पालक मंत्री चंद्रपूर तथा लोकलेखा समिती प्रमुख याच्या संकल्पनेतून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारचे सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा या ठिकाणी वाटर फिल्टर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धानोली तांडा येथे सनी टायगर मशीन माजी आमदार संजय धोटे यांच्या पुढाकाराने उपलब्ध झाली.
आज दिनांक 4/6/2021 शुक्रवार रोजी लोकार्पण सोहळा संपन्न उदघाटक म्हणून श्री.संजयभाऊ धोटे माजी आमदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी माननिय श्री.अरुण भाऊ मडावी सरपंच चनई बू.सरपंच विजय भाऊ रणदिवे,सरपंच सौ संगीता तलांडे मांडवा,अनिल कवरांसे शहराध्यक्ष कोरपणा, अनिल तलांडे,डॉक्टर शालिनी तरोने वैद्यकीय अधिकारी मांडवा, ओम पवार जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा,जगाजी सोयाम,ज्योतीराम मंगाम, गणपत मडावी, विपुल मूनावतन,जे .डी .शिंदे आरोग्य सेवक आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आदरणीय माजी आमदार धोटे यांनी ग्रामीण भागातील कोविड लसीकरण जनतेने न घाबरता लस घेण्याचे आव्हान केले त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे त्याठिकाणी सूचना केल्या धानोली तांडा ग्रामपंचायत व प्राथमिक उपकेंद्र येथील कामकाजाबद्दल सरपंच विजय रणदिवे आरोग्यसेवक शिंदे यांचे कौतुक करून अभिनंदन केले डॉक्टर शालिनी तरो ने यांच्या कुशल आरोग्य सेवेबद्दल सुद्धा जनतेच्या वतीने आभार मानले.गावातील नागरिक आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *