BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

पंचायतराज अभियानात काटोल पंचायत समिती विभागात प्रथम तर राज्यात दुसरी सभापती संजय डांगोरे यांनी स्वीकारला पुरस्कार एकूण 28 लाखाचे पुरस्कार प्राप्त

Summary

काटोल-प्रतिनीधी राज्य शासनाकडून यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत प्रशासकीय व्यवस्थापन व विकास योगदान कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येते.काटोल पंचायत समितीला २०२२-२३च्या यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत नागपूर विभागातून 11लक्ष रुपयाचा प्रथम क्रमांकाचा तर राज्यातून 17 लक्ष रुपयाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार विभागीय आयुक्त […]

काटोल-प्रतिनीधी

राज्य शासनाकडून यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत प्रशासकीय व्यवस्थापन
व विकास योगदान कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येते.काटोल पंचायत समितीला २०२२-२३च्या यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत नागपूर विभागातून 11लक्ष रुपयाचा प्रथम क्रमांकाचा तर राज्यातून 17 लक्ष रुपयाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या शुभहस्ते सभापती संजय डांगोरे यांनी वनामती सभागृह, नागपूर येथे स्वीकारला.
यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, वनामती संचालक डॉ. मिथाली सेठी, विभागीय उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारतेवेळी काटोल पंचायत समिती सभापती संजय डांगोरे, उपसभापती निशिकांत नागमोते, गटविकास अधिकारी दीपक गरुड, माजी बिडीओ संजय पाटील,पं. स.सदस्य धम्मपाल खोब्रागडे, अनुराधाताई खराडे, चंदाताई देव्हारे,अरुण तह तज्ञ उईके, लताताई धारपुरे,प्रतिभाताई ठाकरे, विस्तार अधिकारी प्रविण गावंडे, विस्तार अधिकारी उत्तम झेलगोंदे,विस्तार अधिकारी सुरेश नेहारे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सभापती संजय डांगोरे म्हणाले, काटोल पंचायत समिती नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. पंचायत समितीत व्यवस्थापन, कार्यपद्धती, स्वच्छता उत्तम आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा मान सन्मान होतो. सभापती म्हणून यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात पुरस्कार पटकावणे ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. पुढील काळामध्ये सर्वांच्या सहकार्याने आणखी जास्त प्रयत्न करून पंचायत समितीचे नाव देशपातळीवर नेण्याची ग्वाही दिली.
नागपूर विभागातील एकूण 63 पंचायत समितीमधून काटोल पंचायत समितीला सर्वाधिक पुरस्काराचा मान मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *