देसाईगंज शहरात रक्तदान शिबिर संपन्न
आ. कूष्णा गजबे यांच्या शुभहस्ते रक्तादान शिबिराचे उद्दघाटन समारंभ संपन्न
देसाईगंज शहरात दिवसेंदिवस कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे, जिल्हयात रक्ताचा साठा कमी प्रमाणात आहे. जिल्हा ब्लड बँकमध्ये फारश्या प्रमाणात रक्त उपलब्ध नाही. पेंशटला रक्त पुरवठा करण्यास अडचणी येत आहे व जिल्हयात रक्ताची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. याच उद्देश्यांने देसाईगंज शहरातील सामाजिक संघटना समोर येवुन रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 4/10/2020 ला सकाळी 9.00 वा. करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात राजस्थान सेवा मंडळ, मुस्लिम समाज मंडळ, साई सेवा समिती, गजाजन महाराज मंदिर समिती, नई दिशा मंडळ, शिवोत्सव समिती, बाल गणेश उत्सव मंडळ, लोकमत सखी मंच, भवानी मंडळ, टायगर गु्प, शिव प्रतिष्ठाण समिती, तसेच देसाईगंज शहराच्या सामाजिक कार्यकर्ता या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गडचिरोली जिल्हयात कोरोणाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे या गंभीर स्वरूपाच्या महामाहीमुळे जिल्हयात अनेकाचे प्रण दगावले, या माहामारी मध्ये सर्व जण एकञ येवुन एकजुटिने सोशल डिस्टंट ठेवुन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. कूष्णा गजबे यांनी या शिबिराला योग्य असे प्रतिपादन केले, तसेच रक्तदान शिबिरात उपस्थित न. प. देसाईगंजचे मा. किसन जी नागदेवे सभापति पाणी पुरवठा व जलिनवारण समिती, मा. विशाल मेश्राम उपविभागीय अधिकारी देसाईगंज, न.प
देसाईगंज नगराध्यक्ष शालु दडंवते, न. प. देसाईगंज उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सहाय्यक पोलीस निरीक्षक देसाईगंज बावणकर ताई, राजु जेठानी व देसाईगंज शहरातील सेवा समितीचे पदाधिकारी व नागरीक यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेवुन रक्तदान शिबीर कार्यक्रम व उद्घाटन समारंभ पार पडला
मंगला गिरीश चुंगड़े
वडसा
महिला न्यूज रिपोर्टर