*जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे जागतिक महिला दिन थाटात संपन्न.*
*नागपूर* कन्हान : – जागतिक महिला दिनी जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे गणेश नगर कन्हान येथे कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून महिलांचे विविध विकासात्मक कार्यक्रमाने जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला.
सोमवार दि.८ मार्च ला सायंकाळी ४ वाजता गणेश नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाच्या अध्यक्षा विशाखा ठमके यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी शोभा अहिर, वाटकर काकु यांच्या हस्ते पुष्प, माल्यार्पन व विन्रम अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा मायाताई इंगो ले हयानी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन महिला स्वालं बीकरण, सबलीकरण, स्वयंरोजगार निर्मिती या विषया वरील विविध कार्यक्रमाची माहीती स्पष्ट करून महि लांनी विविध कला कौशल्य, कार्यक्रम सादर करण्यास प्रोत्साहित केले. प्रमुख अतिथी व कार्यक्रमाच्या अध्य क्षा विशाखा ठमके हयांनी महिला दिनाचे औचित्य साधुन महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसं चालन विद्या रहाटे नी तर आभार सुषमा बांते हयानी व्यकत केले. कार्यक्रमास छायाताई नाईक, रंजनाताई इंगोले, लताताई जळते, पुष्पा चिखले, सुनिता ईखार, मनिषा पारधी, शितल बांते, कविता खैरकार, अनिता पाजुर्णे, बेबीताई ठाकरे, गोदावरी नागरे, मनिषा धुडस, सुनिता खैरकार, मिनल मडगे, किरण अनकर, अनिता चकोले, लता लुढुरे, श्रीखंडे, गि-हे आदीने उपस्थित राहुन थाटात जागतिक महिला दिन साजरा केला.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147