जमिनीच्या जुन्या वादातुन भांडण करून मारहाण एक गंभीर जख्मी. कांद्री येथे एका इसमाला जिवानिशी मारण्याचा प्रयत्न.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री येथे जमीनी च्या मालकी हक्काबाबत जुन्या वादातुन आरोपींनी फिर्यादी च्या डोक्यावर हातोडी व लोंखंडी पाईपाने जिवानिशी ठार मारण्याचा उद्देशाने ५ ते ६ वेळा मारुन गंभीर जख्मी केल्याने फिर्यादीच्या तोंडी बयाणा वरून कन्हान पोलीसांनी पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१४) जुन २०२१ ला सायंकाळी ६:०० ते ६:३० वाजता दरम्यान दिपक हरिभाऊ पोटभरे वय ५३ वर्ष रा. कांद्री वार्ड क्र. ६ हा आपल्या मुलासोबत आंबे घेण्याकरिता कांन्द्री बस स्टाॅप येथे गेले असता दरम्यान आरोपी १) देवेंन्द्र पोटभरे व २) नरेंन्द्र पोटभरे रा. कांद्री वार्ड क्र.६ हे तिथे गेले व देवेंन्द्र पोटभरे याने फिर्यादी दिपक हरिभाऊ पोटभरे यास म्हटले कि “तुम्ही दोघे नवरा बायको आमच्याकडे घुरावुन पाहत जाऊ नका” असे म्हटले व त्याच्या जवळ असलेल्या लोखंडी हातोडीने दिपक पोटभरेच्या डोक्यावर जिवानिशी ठार मारण्याचा उद्देशाने ५ ते ६ वेळा मारुन अश्लिल शब्दात शिवीगाळ करून “तुला जानसे मारुन टाकतो” असे म्हटले. यानंतर आरोपी २) नरेन्द्र पोटभरे याने देवेंन्द्र पोटभरे च्या हातुन तिच हातोळी घेवुन दिपक पोटभरे यास मारहाण केली. सदर घटनास्थळी आरोपी ३) सुरेन्द्र पोटभरे, ४) रामकृष्ण पोटभरे ५) सौ इंद्रावती पोटभरे सर्व रा. कांद्री वार्ड क्र.६ हे येवुन आरोपी सुरेन्द्र पोटभरे याने फिर्यादी दिपक पोटभरे च्या हातावर व पायावर लोखं डी पाईपाने मारहाण केली. यावेळी दिपक पोटभरे चा भाऊ प्रकाश पोटभरे हा त्यास सोडविण्याकरिता आला असता त्याला सुद्धा आरोपी सुरेन्द्र पोटभरे याने पाठीवर व हातावर मारहाण केली आणि आरोपी ४) रामकृष्ण पोटभरे व ५) सौ इंद्रावती पोटभरे यांनी ” नेहमीच किटकिट आहे आज तुम्हाला खतमच कराय च आहे ” अशी धमकी देत आरोपी सौ इंद्रावती पोटभ
रे हिने फिर्यादी दिपक पोटभरे याच्या गालावर हातबु क्कीने माराहण केली. अशा प्रकारे पाच आरोपींनी बेकायदेशीर जमावाची मंडळी जमवुन फिर्यादी दिपक हरिभाऊ पोटभरे यास जिवानिशी मारण्याचा उद्देशाने लोखंडी हातोडी व लोखंडी पाईपानी मारून गंभीर जख्मी केल्याने उपचारार्थ नागपुर दवाखान्यात उपचा रार्थ दाखल करण्यात आले. सदर प्रकरणी फिर्यादी दिपक हरिभाऊ पोटभरे यांचे तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, २९४, ५०६ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून तपासात घेत आरोपीचा शोध घेणे सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात सपोनि सतीश मेश्राम हे करीत आहे.