BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*घुग्गुस येथे मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन* *डॉ. बाबासाहेब आधुनिक भारताचे शिल्पकार- विवेक बोढे शहराध्यक्ष भाजपा घुग्गुस यांचे प्रतिपादन*

Summary

  बुधवार 14 एप्रिलला सकाळी 11 वाजता घुग्गुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. सामाजिक अंतराचे पालन करून साधेपणाने 130 वी भीमजयंती साजरी करण्यात आली. यावेळी […]

 

बुधवार 14 एप्रिलला सकाळी 11 वाजता घुग्गुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
सामाजिक अंतराचे पालन करून साधेपणाने 130 वी भीमजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी घुग्गुस नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समितीचे रामचंद्र चंदनखेडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर मेणबत्ती प्रज्वलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामूहिक बुद्धवंदना घेऊन दोन मिनिट मौन पाळण्यात आले.

मनोगत व्यक्त करताना घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे म्हणाले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांच्या जन्म 14 एप्रिल 1891 साली महू येथे झाला. त्यांनी भारतात जाती व्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली.
समाजातील शोषित पीडित अस्पृश्याना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आपले जीवन वाहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभुषित शिक्षकतज्ज्ञ होते. समाजातील शोषित पीडित अस्पृश्यान साठी शिक्षणाचे दारे उघडी केली अश्या महामानवास मी विनम्र अभिवादन करतो असे प्रतिपादन केले.

यावेळी घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समितीचे अनिरुद्ध आवळे,भारत चांदेकर, मनोहर भरणे भाजपा नेते ऋषीं कोवे दिलीप कांबळे,मधुकर धांडे घुग्गुस प्रिन्सी महिला बचत गटाच्या शारदा झाडे, वैशाली भालशंकर, शारदा फुलझले, छाया पाटील उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *