*कंटेनर पलटला 40गोधन मृत 30गंभीर,ईलाज सुरू* *नागपुर अमरावती महामार्गक्र06* *पशु(गोवंश)तस्करांसाठी पोषक* *वर्धा जिल्हातील सावळी खुर्द ची घटना* *मिशन ब्रेक द चेन* *या काळातही जनावरांची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय* *नागपुर-अमरावती रेंज चे पोलिस महानिरीक्षक या कडे लक्ष देतील काय?* *नागपुर-वर्धा-अमरावती च्या पोलीस अधिक्षकांनी हरियाणा-मध्यप्रदेश मार्गे येणारे कंटेनरांची कसून चौकशी ची गरज* * हरियाणा -म-प्र वरून कोंढाळी- कारंजा -मार्गे हैद्राबाद कडे होत असते अवैध वाहतूक*
Summary
कोंढाळी-वार्ताहर गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु हरियाणा-मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने नरखेड-काटोल-कोंढाळी मार्गे हैद्राबाद-अमरावती- औरंगाबाद कडे अवैध वाहतूक सुरू आहे. गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु हरियाणा व मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने […]

कोंढाळी-वार्ताहर
गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु हरियाणा-मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने नरखेड-काटोल-कोंढाळी मार्गे हैद्राबाद-अमरावती- औरंगाबाद कडे अवैध वाहतूक सुरू आहे.
गोहत्या बंदी कायद्याचे नियम कडक असून, जनावरांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतु हरियाणा व मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने नरखेड-काटोल-कोंढाळी-कारंजा (घा) मार्गे अमरावती-बडनेरा-औरंगाबाद-
तसेच हैद्राबाद कडे गोधना व म्हशी-रेडे यांची तस्करी केली जात आहे. मध्यप्रदेशांतून राज्याचे उपराजधानी नागपूर चे ग्रामिण भागातून जाणार्या महामार्गे हैदराबाद येथे वाहनात डांबून जनावरांची वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे.
*70पैकी 45गोवंशाचा मृत्यू*
09जून चे पहाटे नागपुर अमरावती राष्ट्रिय महामार्गावर वर्धा जिल्ह्यातही कारंजा पोलीस स्टेशन चे हद्दीतील सावळी खुर्द गावानजिक ट्रक क्र एच आर -55-एस8795हा हरियाणा- म प्र -मार्गे महाराष्ट्रात दाखल होत नरखेड काटोल कोंढाळी मार्गे 70गोवंशांची क्रूरतेने वाहतूक करत अमरावती कडे अमरावती जात होते मात्र वेगात असलेला हा कंटेनर वरचे चालकाचा वाहनावरुन नियंत्रण सुटले व सावळी नजीक महामार्गा लगत सडकेच्या कडेला पलटला . वेगात असलेले कंटेनर मधील 70पैकी 40गोवंशाचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे तर गंभीर जखमी जनावरांना कारंजा पशुवैद्यकिय अधीकारी यांचे सहकार्याने जखमी जनावरांना औषधोपचार करन्यात आला. कारंजा पोलीस स्टेशन चे अधिकारी दारासिंग राजपूत आपले स्टाफ सह घटनास्थळी पोहचून जखमी जनावरांचे औषधोपर करवून घेत मृत जनावरांना खोल खड्डा खोदून पुरविण्याचे काम केले. या घटनेतील कंटेनर चालक बातमी लिहे पर्यंत फरार होता. कारंजा (घा)या चालकाचा शोध घेत आहेत.
*तस्करांचा महामार्गावर दबदबा*
नागपुर-अमरावती महामार्गावर तस्करांचा दबदबा असल्याने व संबधीत भागातील पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलीस हवालदारांचे मार्फत आर्थिक हित जोपासल्याने त्यांच्यावर थातुरमातुर कारवाई होत असल्याने तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
कोरोना संक्रमण काळात महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराज्यीय गोधन व पशुधन तस्कारीच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. मध्यप्रदेशातून गोधनाची चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशांतून लगतच्या तालुक्यातून अवैध वाहतूक सुरू आहे. या कडे नागपुर-वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांनी कडक निर्देश दिल्यास व हरियाणा मध्यप्रदेशांतून येणारे कंटेनरांची चोखपणे तपासनी केल्यास आंतरराज्यीय अवैध पशु वाहतूक तस्करी वर प्रतिबंध बसू शकतो.