हेडलाइन

ओबीसी च्या सर्व न्याय व संवैधानिक मागण्या मान्य होणार : मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री व ओबीसी नेत्यांची मुंबई येथे बैठक संपन्न

Summary

गडचिरोली:- दि. 7 डीसेंबर 2020 ला मुंबई येथील हीवाळी अधिवेशनावर धडकणा-या ओबीसी समाजाच्या मोर्चाची तातडीने दखल घेवुन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना काल (दि.20नोव्हेंबर 20) ला आमंत्रित केले होते. यावेळी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे […]

गडचिरोली:- दि. 7 डीसेंबर 2020 ला मुंबई येथील हीवाळी अधिवेशनावर धडकणा-या ओबीसी समाजाच्या मोर्चाची तातडीने दखल घेवुन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना काल (दि.20नोव्हेंबर 20) ला आमंत्रित केले होते. यावेळी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे व राज्याचे ईतर मागास बहुजण कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थाही झालेल्या बैठकीला राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, मुंबई व ठाणे, विदर्भ आदी विभागातील मुख्य ओबीसी नेते मुंबई येथे उपस्थित होते, ज्यामधे राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, माजी आमदार प्रकाशजी शेंडगे, चंद्रकांत बावकर, बाळासाहेब सानप, शकील अहमद, बालाजी शेंडे, शरद वानखेडे, प्रदीप वादाफळे, बबलू कटरे, शकील पटेल, अविनाश लाड, जे. डी. तांडेल, पल्लवी रेणके, अरुण गरमाडे, सुरेश पाटीलखेडे, शांताराम दिघे, प्रमोद मोरे, प्रकाश भागरथ, अरुण मडके, एकनाथ मारमने, बाळासाहेब सुतार, बाळासाहेब पंचाळ, प्रकाश राठोड, साधनाताई राठोड, बादल गायकवाड व बारा फबलुतेदार प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीत ओबीसी जनगणना केंद्र करीत नसेल तर राज्य करेल ही मागणी जवळपास मान्य करण्यात आली, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही व मराठा समाजाची पण तशी मागणी नाही, असे सांगण्यात आले, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा लवकर घेण्यात येईल, सर्व जिल्ह्यात 19 टक्के आरक्षण राहील याची लवकरच अंमलबजावणी होईल, केंद्राप्रमाणे सुधारित बिंदू नामावली लागू होईल, केंद्राचा प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा 2019 लागू होईल, ओबीसी साठी मेगा भरतीसाठी मंत्री मंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, 22 ऑगस्ट 2019 ची बिंदूनामावली स्थगिती लवकर उठेल, ओबीसी साठी पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यास सरकार सकारात्मक राहील, ओबीसी महामंडळ व महाज्योती संस्थेस वाढीव निधी देणार, यावर चर्चा झाली व लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव लक्षात घेता व मा. मुख्यमंत्री यांच्या विनंतीला मान देवून 7 डीसेंबरला मुंबई येथे विधानभवन अधिवेशनावर होवू घातलेला ओबीसी समाजाचा महामोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे सांगण्यात आले आहे.

सोमवार (दि.23) ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची केंद्राचा प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा 2019 लागू करण्याबाबत व ईतर विषयांना घेवुन ना. उदय सामंत यांच्या सह मुंबई येथे बैठक होणार आहे.

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *