आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी केले रक्तदान
Summary
प्रतिनिधी गडचिरोली:- गडचिरोली येथील नवजीवन वसाहत येते आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आणि समाजसेवा कार्याचा वास्तविक योग्य परिचय दिला आहे. नक्षल चळवळीला त्रासून शासनाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी नक्षली आत्मसमर्पण करीत असतात. शासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या […]

प्रतिनिधी गडचिरोली:-
गडचिरोली येथील नवजीवन वसाहत येते आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आणि समाजसेवा कार्याचा वास्तविक योग्य परिचय दिला आहे. नक्षल चळवळीला त्रासून शासनाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी नक्षली आत्मसमर्पण करीत असतात. शासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नक्षल्यांना नक्षल चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पणाचे आवाहन केले जाते. आत्मसमर्पित नक्षल्यांना शासन व प्रशासन अनेकविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येतो . आज ६ जून रोजी नवेगाव येथील नवजीवन वसाहतीत गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, पोलीस उप अधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या रक्तदान शिबिरात १०० ते १२० आत्मसमर्पित नक्षल सदस्यांची हजेरी होती.
यावेळी रक्तदान शिबिरात २० आत्मसमर्पित नक्षल्यांनी स्वच्छेने रक्तदान केले. या शिबिराला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील १ डॉक्टर व १२ टेक्निशियन हजर राहून तपासण्या व रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली. शिबीर दरम्यान सामाजित अंतर ठेवून शिबीर पार पाडण्यात आले.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पोलीस उप निरीक्षक गंगाधर एस ढगे व टीम सरेंडर सेलचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.