हिंदु देवी, देवतांचे फोटो फटाक्या वरील चित्र लावुन लक्ष्मी देवी देवंतांचा अपमान थांबविण्याबाबत….
जिल्हा नागपूर वार्ता:- दक्षिण नागपूर येथील शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रभाग क्र. 29 चे दिपक पोहनेकर यांनी 19 ऑक्टोबर रोजी, मनपा आयुक्तांना, महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच शिवसेना प्रमुख,
विजय वडेट्टीवार याना निवेदन दिले. गेल्या कित्येक वर्षा पासून दिवाळी ला जे लक्ष्मी बाॅब विकल्या जाते. आणि तेच फटाके नागरिक घेउन जाउन फोडतात. अश्या प्रकारे हिन्दु देवी देवतांचा अपमान केला जातो.दिवाळी ला आपण लक्ष्मी मातेची पुजा करतो आणि त्याच दिवशी लक्ष्मी देवीचे फोटो असलेले फटाके म्हणजे लक्ष्मी बाँम्ब फोडल्या जातात. हे आपण थांबवावे. यावरील कठोर कारवाई करावी व लक्ष्मी बाॅब बाजारात येणे थांबवावे हा एक प्रकारे हिन्दु देवी देवतांचा तसाच हिन्दु धर्माचा अपमान होत आहे. हे योग्य नाही. फटाक्यांशी संबधित सर्व व्यवसाय करणाऱ्यानी ही बाब लक्षात घेऊन यावर बदल होईल व सरकार नी कठोर कारवाई व निर्देश जारी करुन हा लक्ष्मी बाॅब थांबवाल अशा प्रकारचे निवेदन दिले आहे. आज दि. 22 ऑक्टो 2020 ला म्हाळगी नगर चौकात शिवसैनिकांनी जनतेला जागृत करण्यासाठी लक्ष्मी बाॅब चा निषेध करून मुक आंदोलन केले. याप्रसंगी शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिपक पोहनेकर तसेच वरिष्ठ शिवसैनिक संजयजी पांडे, सिध्दु कोमजवार, विनोद शाहु, शैलेंद्र आंबीलकर, लकी मात्रे, मोहीत खांदेकर, लक्ष्मीकांत रणदिवे, संकेत तिवारी, आशिष लोखंडे इत्यादी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा
9579998535