BREAKING NEWS:
महाराष्ट्र

सावधान! तुम्हालाही मिळाला आहे का असा मेसेज? गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट

Summary

नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा गेल्या काही महिन्यांत बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढली आहेत. डिजिटल बँकिंग आणि ऑनलाइन व्यवहार करणार्‍यांना लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या बँक खात्याबद्दल सावधगिरी बाळगणे […]

नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा

गेल्या काही महिन्यांत बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढली आहेत. डिजिटल बँकिंग आणि ऑनलाइन व्यवहार करणार्‍यांना लक्ष्य केले जात आहे.

अशा परिस्थितीत आपण आपल्या बँक खात्याबद्दल सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. वाढत्या फसवणूकीच्या पार्श्वभूमीवर बँक, आरबीआय, एनपीसीआय आणि सरकार वेळोवेळी याविषयी सामान्य लोकांना सतर्क करत राहते.

सायबर क्रिमिनल लोकांना लुटण्यासाठी आणि अशा फ्रॉडची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबतात. गेल्या काही काळापासून हे गुन्हेगार या प्रकारचे फ्रॉड करण्याचा नवीन मार्ग अवलंबत आहेत. गृह मंत्रालयाने या प्रकरणाची माहिती दिली आहे.

सायबर दोस्त या ट्विटर हँडलवर ट्विट करुन सरकार फसवणूकीच्या या नव्या पद्धतींबद्दल माहिती देऊन सतर्क केले आहे. मंत्रालयाने लोकांना सांगितले आहे की, हे फसवे लोक आता लोकांना पैसे पाठवत आहेत आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे उडवित आहेत.

लोकं कोणत्याही मेसेजमध्ये येत असलेल्या लिंकवर क्लिक करू नका. आपल्यालाही जर असा मिळाला असल्यास त्वरित सायबर क्राइम पोलिसांना कळवा.

नागरिकांना ‘हे’ मेसेज येत आहेत..

यूजर्सना असा मेसेज पाठवत पाठविला जात आहे की, आपल्या बँक खात्यात नॉमिनी व्यक्तीला जोडले गेले आहे. आता आपण फक्त 30 मिनिटांत नॉमिनी व्यक्तीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सक्षम असाल. जर आपण तसे केले नसेल तर या लिंकवर क्लिक करुन आपण तक्रार नोंदवू शकता.

लिंकवर क्लिक करून चोरी केली जाते माहिती

या लिंकवर क्लिक करून हॅकर्स आपली सर्व माहिती चोरू शकतात. अशा परिस्थितीत अशा लिंकवर कधीही क्लिक करू नका कारण अनेक वेळा लोकं कोणताही विचार न करता अशा लिंकवर क्लिक करतात आणि हॅकर्सना त्यांची माहिती मिळते.

या व्यतिरिक्त, आजकाल फ्रॉडस्टर्स स्कॅमर, फिशिंग ईमेल, एसएमएस आणि फोन कॉल करून लोकांना फसवत आहेत. हे फ्रॉडस्टर्स स्वत: ला बँक अधिकारी, आरबीआय अधिकारी, आयकर अधिकारी इ. म्हणून संबोधून लोकांची फसवणूक करीत आहेत.

एवढेच नव्हे तर हे फ्रॉडस्टर्स बनावट बँकिंग अ‍ॅप्स बनवित आहेत, ज्यामध्ये युझर्स फसवणूकीच्या जाळ्यात अडकत आहेत. जेव्हा युझर्स असे बनावट बँकिंग अ‍ॅप्स डाउनलोड करतात तेव्हा सायबर फ्रॉडस्टर्स फसवणूक करून त्यांच्या खात्यातून पैसे घेऊन जातात

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *