“पक्षपात न करता मदत करणे हि केंद्राची जबाबदारी आहे “- मुख्यमंत्री
Summary
मुम्बई वार्ता:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सोलापुरात दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातून दौऱ्याला सुरुवात केली. सांगवी गावातील नुकसानाची त्यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतली. “केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारनं […]
मुम्बई वार्ता:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सोलापुरात दौऱ्यावर आहेत.
सकाळी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातून दौऱ्याला सुरुवात केली. सांगवी गावातील नुकसानाची त्यांनी पाहणी केली.
या पाहणीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतली.
“केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारनं तात्काळ मदत करावी या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीबद्दल प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, तात्काळ मदत सुरूच आहे. केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. पक्षपात न करता देशाची काळजी घेणं हे केंद्राचं कर्तव्य आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी फोन करून विचारपूस केली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
पंतप्रधानांशी बोलल्यावर माझी खात्री पटली आहे की राज्याला जी मदत हवी आहे ती दिल्याशिवाय ते राहणार नाहीत, अशी माहिती उद्धव यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10 महिलांना धनादेश देण्यात आले.
“पंचनामे करुन सरकार मदत करणार आहे. त्यामुळे आज कोणतीही घोषणा करणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. “परतीच्या पावसाचं संकट अजून टळलेलं नाही. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी बातचीत केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.
नुकसानीच्या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिलं.
साजन रमेश कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
8169048053