BREAKING NEWS:
महाराष्ट्र

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या आदेशाची अवहेलना..???

Summary

गडचिरोली/२० जानेवारी २०२१ येथील जिल्हा सामान्य रुग्णालया चे आणि जिल्ह्यातील तालुक्यातील रुग्णालयाचे हाॅट पाॅवर असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे यांच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या मुलचेरा येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ मल्ल्लिक सह डॉ महल्ले यांचे वर कारवाई कोण करणार??? असा […]

गडचिरोली/२० जानेवारी २०२१
येथील जिल्हा सामान्य रुग्णालया चे आणि जिल्ह्यातील तालुक्यातील रुग्णालयाचे हाॅट पाॅवर असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे यांच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या मुलचेरा येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ मल्ल्लिक सह डॉ महल्ले यांचे वर कारवाई कोण करणार??? असा संभ्रमित प्रश्न निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ अनिल रुडे आणि जिल्हा परिषद चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत शंभरकर यांच्या भोंगळ कारभारामुळे आणि निष्काळजीपणामुळे एकाहून अनेक कर्मचाऱ्यांच्या सुरस कहाण्या ऐकून जनता सुन्न होत आहे.. तालुका स्तरावर असलेल्या अनेक रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकासह अन्य वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात उपस्थित राहून सेवा देत नसल्याने सामान्य जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दुर्गम आदिवासी भागातील जनतेला दर्जेदार आणि वेळोवेळी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यातील मुलचेरा या तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयाची उत्तम आणि प्रशस्त इमारती बांधल्या गेल्या आहेत. परंतु येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ मल्लिक आणि डॉ महल्ले यांच्यात मिलीभगत होऊन १०- -१० दिवस ड्युटी करून आपल्या गावाला पोबारा करण्यात यशस्वी होतात… यात वरिष्ठ पातळीवर असलेल्या अधिकाऱ्याच्या आशिर्वाद तर नाही ना????? अशा अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी Laboratory services च्या प्रकल्पाअंतर्गत महालॅब सुरू करण्यात आल्या. त्यात ६४ पदे भरण्यात आली होती.परंतु प्रत्यक्षात मात्र पात्रता नसतांनाही प्रत्येकी ३० ते ५० हजार रुपये घेऊन या भरतीचा गोरखधंदा करण्यात आला असल्याची चर्चा असुन विश्वसनिय वृत्त हाती आले आहे. हा गोरखधंदा करण्यातही कोणकोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी NHM समायोजनाच्या प्रकरणा सारखी सखोल चौकशी सुरू करून दोशीं वर कारवाई करावी.. त्या कालावधीत आपल्या स्वाक्षरीने ६४ पदे भरुन आता तो… मुंबई येथील मुख्यालयात असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *