जगतगुरु श्री संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी
Summary
भविष्यात होणाऱ्या गोष्टी चे भाकीत करणारे, गुलामी झुगारणारे,नायकी करणारे,जुलमी राजवटी विरूद्ध बंड पुकारणारे,वेळ प्रसंगी अन्याया विरुद्ध बंड पुकारून अस्तित्वासाठी संघर्ष करणारे असे बहु आयामी व्यक्तिमत्व यांची 282 वी जयंती गोर बंजारा उत्सव समिती,आर्वी.तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमतः जगतगुरु श्री […]
भविष्यात होणाऱ्या गोष्टी चे भाकीत करणारे, गुलामी झुगारणारे,नायकी करणारे,जुलमी राजवटी विरूद्ध बंड पुकारणारे,वेळ प्रसंगी अन्याया विरुद्ध बंड पुकारून अस्तित्वासाठी संघर्ष करणारे असे बहु आयामी व्यक्तिमत्व यांची 282 वी जयंती गोर बंजारा उत्सव समिती,आर्वी.तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमतः जगतगुरु श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पूजा अर्चना करून झेंडा चढवून अरदास घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री नितीनजी जाधव, (R.F.O.)आर्वी. तसेच प्रमुख अतिथी मा.श्री नामा भाऊ बंजारा,महासचिव, अ. भा.तां.सुधार समिती. नागपूर .यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विध्यार्थ्यांचे मनोगत तसेच रंगारंग कार्यक्रमात नृत्याने भरगच्च मनोरंजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नितीनजी जाधव सर यांनी आपल्या सम्बोधनात श्री संत सेवालाल महाराजांनी ।। शिका छ शिकावं छ ।। शिके राज घडावा छ ।।असा मंत्र त्यांनी सर्व बंजारा समाजाला दिला.व अंधश्रद्धेपासून समाजाला परावृत करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतोनात प्रयत्न केले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री नामा बंजारा यांनी श्री.संत सेवालाल महाराजानीं आदर्श तांडा संस्कृती निर्माण करून समाज सुधारणेचे कार्य केले. एक तत्ववेता ,एक थोर समाज सुधारक,समृद्ध व्यापारी,महान पराक्रमी ,त्रिकालदृष्टी प्राप्त थोर भविषय वेत्ता होते.
त्यांची शेवटची इच्छा पोरीयागड (पोहरादेवी) ता. मानोरा येथे चिरनिद्रा घेणे ही होती. त्यांनी पौष शुक्ल पक्ष मंगळवार 2जानेवारी 1806 रोजी
रुईगड ता. दिग्रस. जिल्हा : यवतमाळ येथे समाधी घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी .जाधव तर आभारप्रदर्शन श्री. किसनजी जाधव. यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. नायक देवीदासजी चव्हाण,कारभारी मा.दिल्लीपजी जाधव,श्री.दसरथजीं जाधव तसेच गोर बंजारा उत्सव समिती, आर्वी. जि. वर्धा. येथील सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी योग्य रित्या पार पाडली.