BREAKING NEWS:
पुणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांची जलपूजनाचा कार्यक्रम रद्द

Summary

पत्रकार – सागर घोडके पुणे ( मावळ) पवनानगर – पिंपरी चिंचवडची तहान भागवणारे पवना धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा( माई ) ढोरे जलपूजन करण्यासाठी शनिवार दिनांक ४ सप्टेंबरला येणार असल्याचे माहिती धरणग्रस्ताना मिळाली होती. जलपूजनाला यायचे […]

पत्रकार – सागर घोडके
पुणे ( मावळ)

पवनानगर – पिंपरी चिंचवडची तहान भागवणारे पवना धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा( माई ) ढोरे जलपूजन करण्यासाठी शनिवार दिनांक ४ सप्टेंबरला
येणार असल्याचे माहिती धरणग्रस्ताना मिळाली होती.
जलपूजनाला यायचे असेल तर पुर्नवसनाचा प्रश्न आधी मार्गी लावावे . असे धरणग्रस्तानी पत्रक काढले होते. आज महापौर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर धरणग्रस्त आणि शिवसैनिकांनी सकाळी ७ वाजल्यापासून पवना धरणाच्या गेटवर ठिय्या देऊन बसले होते. पण नंतर महापौर येणार नसल्याचे कळाल्यानंतर शिवसैनिकांच्या वतिने घोषणाबाजी देत निषेध करण्यात आला. त्यानंतर शिवसैनिकांनी पवनानगर चौकात घोषणाबाजी देत निषेध व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
तसेच शिवसेनेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांनी ३० अॉगस्ट रोजी जलपूजन केले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी खासदारांवर टिका केली होती. यामुळे मावळ शिवसेनेने याला विरोध करत आक्रमक भूमिका घेतल्याचे असे वाटते.
या वेळी जिल्हा सदस्या शैला खंडागळे, उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू, तळेगाव शहर प्रमुख दत्ता भेगडे, शहर प्रमुख सुरेश गुप्ता, पवनमावळ संघटक ज्योती सावंत, धरणग्रस्त रविकांत रसाळ , अन्य धरणग्रस्त व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *