BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा पोलिसांचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा प्रियकर आणि बेकायदेशीर प्रसूती करणारा ‘तो’ डॉक्टर जेरबंद ​पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, तपासासाठी प्रकरण गोंदिया पोलिसांकडे वर्ग

Summary

भंडारा / गोंदिया: लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रियकराला आणि या गंभीर गुन्ह्याची माहिती लपवून बेकायदेशीर प्रसूती करणाऱ्या गोंदियातील एका डॉक्टराला भंडारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि विशेषतः […]

भंडारा / गोंदिया:
लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रियकराला आणि या गंभीर गुन्ह्याची माहिती लपवून बेकायदेशीर प्रसूती करणाऱ्या गोंदियातील एका डॉक्टराला भंडारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी (वय १६ वर्षे ८ महिने) छत्तीसगडमधील बिजापूर येथे मजुरीसाठी गेली असताना तिची ओळख मुख्य आरोपी मुकेशकुमार रुद्रकुमार मनसुरे (वय २२ वर्षे, रा. कुमारीकला, जि. बालाघाट) याच्याशी झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही मुकेशकुमारने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यातून पीडिता सात महिन्यांची गरोदर राहिली.

​डॉक्टराचा पैशाचा हव्यास आणि संगनमत
​डिसेंबर २०२५ मध्ये पीडितेची प्रकृती बिघडल्याने आरोपीने तिला गोंदिया येथील डॉ. नितेश नरेंद्रकुमार वाजपेयी (वय ४० वर्षे) यांच्या रुग्णालयात नेले. मुलगी अल्पवयीन आहे आणि पॉक्सो कायद्यानुसार अशा घटनेची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असतानाही, डॉ. वाजपेयी यांनी पैशाच्या हव्यासापोटी माहिती दडवून ठेवली आणि कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया न पाळता मुलीची प्रसूती केली.

​असा झाला खुलासा
​वरठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका जुन्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत साकोली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२) (एम) (आय) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८, २१ नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
​पुढील कारवाई आणि तपास पथक
​प्रसूतीचा प्रकार गोंदिया शहरात घडल्याने हा तपास आता गोंदियातील रामनगर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या त्यांच्या ताब्यात आहेत. ही कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने केली. या पथकामध्ये सपोनि विवेक सोनवणे, सपोनि प्रतिभा राऊत, पोउपनि अजय मडावी व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

​वृत्त संकलन: अमर वासनिक (न्यूज एडिटर)
📢 पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
🌍 www.policeyoddha.com
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: ७७७४९८०४९१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *