BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

तुमसर पोलिसांचा ‘मिडनाईट’ सर्जिकल स्ट्राईक! तामसवाडीत रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त ​स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; विनापरवाना रेती उपसा करणारे ३ ट्रॅक्टर जेरबंद!

Summary

तुमसर (भंडारा): भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने जिल्ह्यात रेती माफियांविरुद्ध सुरू असलेली ‘क्लीन अप’ मोहीम आता अधिक तीव्र झाली आहे. तुमसर तालुक्यातील तामसवाडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मध्यरात्रीच्या सुमारास थरारक सापळा रचून विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या […]

तुमसर (भंडारा):
भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने जिल्ह्यात रेती माफियांविरुद्ध सुरू असलेली ‘क्लीन अप’ मोहीम आता अधिक तीव्र झाली आहे. तुमसर तालुक्यातील तामसवाडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मध्यरात्रीच्या सुमारास थरारक सापळा रचून विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर धाड टाकली. या कारवाईत सुमारे २४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
​गुप्त माहिती आणि ‘एलसीबी’चा सापळा
​दिनांक १ मार्च २०२६ च्या मध्यरात्री २:४० वाजताच्या सुमारास, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पाटील आपल्या ताफ्यासह रात्रगस्तीवर असताना त्यांना तामसवाडी परिसरात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने तातडीने तामसवाडी परिसरात सापळा रचला. काही वेळातच अंधाराचा फायदा घेऊन तीन ट्रॅक्टर रेती भरून येताना दिसले. पोलिसांनी झडप घालून हे तिन्ही ट्रॅक्टर जागीच रोखले.

​हे आहेत रेती तस्कर
​पोलिसांनी पकडलेल्या ट्रॅक्टर चालकांची चौकशी केली असता, त्यांनी विनापरवाना रेती चोरून नेत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे:
१. मोहित दयाराम गायधने (वय २५, रा. तामसवाडी)
२. शुभम बेनीराम लेंडे (वय ३०, रा. तामसवाडी)
३. विनोड फुलचंद डोंगरवार (वय ३०, रा. तामसवाडी)
​२४ लाखांचा ‘दणका’!
​या धडक कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी ८ लाख रुपये किमतीचे तीन ट्रॅक्टर (एक विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा स्वराज ७३५ XT कंपनीचा ट्रॅक्टर व इतर) आणि प्रत्येकी ६,००० रुपये किमतीची ३ ब्रास रेती, असा एकूण २४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​गंभीर गुन्ह्यांची नोंद
​या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गावंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
​पोलीस योद्धा न्यूज अलर्ट: सरकारी मालमत्तेची चोरी करणाऱ्यांची खैर नाही! तुमसर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती व्यवसायाचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहे.

📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *