चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपुरात २ री विभागीय लोकशाही परिषद; २ मार्च रोजी आयोजन

Summary

चंद्रपूर : लोकशाही मूल्यांची जपणूक आणि भारतीय लोकशाहीची परंपरा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकशाही गणराज्य मंच यांच्या वतीने चंद्रपूर येथे २ री विभागीय लोकशाही परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लोकसत्ताक दिनानिमित्त ही परिषद आयोजित करण्यात येत असून, नागरिकांना लोकशाहीबाबत […]

चंद्रपूर : लोकशाही मूल्यांची जपणूक आणि भारतीय लोकशाहीची परंपरा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकशाही गणराज्य मंच यांच्या वतीने चंद्रपूर येथे २ री विभागीय लोकशाही परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लोकसत्ताक दिनानिमित्त ही परिषद आयोजित करण्यात येत असून, नागरिकांना लोकशाहीबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
ही परिषद रविवार, दि. २ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळेत पार पडणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ समाज कल्याण भवन, जलनगर, दूध डेरी जवळ (चंद्रपूर रेल्वे स्टेशन शेजारी), चंद्रपूर, महाराष्ट्र असे निश्चित करण्यात आले आहे.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये
मा. भदंत धम्मसारथी (नागपूर)
मा. रेव्हरंट मोहन सवसेना (चंद्रपूर)
मा. ह. भ. प. सुंदरा खुशाल बोरकर (चंद्रपूर)
यांचा सहभाग असणार आहे.
परिषदेचा मुख्य विषय “भारतीय लोकशाही ही सर्व भारतीयांच्या सहजीवनाची जीवनपद्धती आहे” असा असून, लोकशाहीच्या मूल्यांविषयी जनजागृती, संविधानिक कर्तव्यांची जाणीव आणि सामाजिक सलोखा यावर चर्चा केली जाणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, लोकशाही ही भारताची जागतिक पातळीवरील ओळख असून तिचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. परिषदेत विविध वक्त्यांच्या मार्गदर्शनातून लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
परिषदेनंतर उपस्थित सर्व नागरिकांसाठी दुपारी ३.०० ते ३.३० या वेळेत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही परिषद “आम्ही भारताचे लोक” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली असून, चंद्रपूर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *