बारामती महाराष्ट्र हेडलाइन

आयुष नगर ग्रामस्थांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Summary

आयुष नगर | प्रतिनिधी बारामती येथे घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार, त्यांचे पीएसओ विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक व फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य […]

आयुष नगर | प्रतिनिधी
बारामती येथे घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार, त्यांचे पीएसओ विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक व फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या हृदयद्रावक घटनेची तीव्र झळ आयुष नगर परिसरातही उमटली असून, येथील ग्रामस्थांनी एकत्र येत दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आयुष नगर येथे आयोजित शोकसभेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, “अजितदादा केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर सामान्य जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे हक्काचे नेतृत्व होते. त्यांनी आयुष्यभर राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी कार्य केले. त्यांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी न भरून निघणारी हानी आहे.”
या शोकसभेत प्रशासकीय शिस्तीचे प्रतीक असलेले अजितदादा पवार आणि कर्तव्यदक्ष विमान कर्मचारी यांचे असे अकाली जाणे हे संपूर्ण देशासाठी दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी मौन पाळून दिवंगतांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.
या श्रद्धांजली सभेला आयुष नगरमधील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. यामध्ये ॲड. मोटघरे सर, गिरीश शास्त्रक्कार, संजय डाखरे, प्रदीप चिताडे, सचिन येरेवार, उक्केकर, भास्करवार, वानखेडे, पेंदाम सर, तेलखडे सर, मानकर, रजत म्हस्के, वसंत येरेवार आणि विशाल नगराळे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
तसेच महिलांच्या वतीने श्रीमती गीता वसंत येरेवार, दीक्षा रविंद्र मोटघरे, म्हस्के ताई, मानकर ताई, भांडवलकर ताई, कल्याणी वानखेडे, अश्विनी रायजादा, पायल मेश्राम, मंजुषा मेश्राम, संजुशा नगराळे तसेच कु. आकृती व हिमांशी यांनी पुष्प अर्पण करून दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली.
या दुःखद प्रसंगी संपूर्ण आयुष नगर परिसर शोकमग्न झाला होता. ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात शोकभावना दिसून येत होती. अजितदादा पवार यांचे नेतृत्व, कार्य आणि जनतेशी असलेले नाते कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *