BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

बोगस बांधकाम कामगारांची “कॅग” मार्फत चौकशी ची मागणी, बांधकाम व्यवसायात खळबळ

Summary

-:बॉक्स:- {नागपूर शहर सह जिल्ह्यातील काटोल, नरखेड ,नागपूर ग्रामीण, तालुक्यासह नागपूर जिल्ह्यात तीन वर्षात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी झालीआहे‌.झालेल्या नोंदणीची ‘कॅग’च्या मार्फत चौकशी केल्यावर संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम कामगार उघड होऊ शकते व बोगस कामगार नोंदणी प्रमाणपत्र […]

-:बॉक्स:-
{नागपूर शहर सह जिल्ह्यातील काटोल, नरखेड ,नागपूर ग्रामीण, तालुक्यासह नागपूर जिल्ह्यात तीन वर्षात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी झालीआहे‌.झालेल्या नोंदणीची ‘कॅग’च्या मार्फत चौकशी केल्यावर संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम कामगार उघड होऊ शकते व बोगस कामगार नोंदणी प्रमाणपत्र देणारे , कंत्राटदार, बांधकाम व्यवसायीक ही उघड होऊ शकतात.}*

तीन्ही तालुक्यातील आणि जिल्हयात मोठ्या संख्येने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची कॅग संस्थेकडून (महालेखापरीक्षक) चौकशी केल्यास अनेक बांधकाम व्यवसायीकांनी राजकिय नेत्यांची मर्जी राखत नागरिकांना बोगस प्रमाणपत्र वाटल्या घ्या तक्रारीतून. यातून बोगस कामगार उघड होणार आहेत. परिणामी गावा गावात बोगस बांधकाम कामगार कोण ? यासंबंधी चर्चा रंगली आहे.जिल्हयात तीन वर्षात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी झाली. नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करता येते. यासाठी बांधकाम कामगार असल्याचा ग्रामसेवक किंवा बांधकाम अभियंत्याचा दाखला असणे बंधनकारक आहे. हे दाखले मिळवून बांधकाम कामगार नसलेल्या अनेकजणांनी नोंदणी केल्याचा संशय आहे. खोट्या बांधकाम कामगारांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आणि खरे वंचित राहिले असाही प्रकार काही ठिकाणी झाला आहे. यासंबंधीत आता कॅगकडून बांधकाम कामगार नोंदणीची सखोल चौकशी केली जाने गरजेचे आहे. पहिल्या टप्यात पथकाकडून जिल्हयातील बांधकाम कामगारांना कोणत्या योजनांचा लाभ मिळाला, कोणत्या गावातील कामगारांना मिळाला याची माहिती घेतलीगेली पाहिजे.तसेच सर्वाधिक दाखले दिलेल्या बांधकाम कंत्राटदार ,अभियंत्यांना बोलवू. ज्या संघटनांचे बांधकाम कामगार बोगस नोंदणीच्या रॅकेटमध्ये आहेत?याची चौकशी करावी.,
बांधकाम कामगारांना ५० पेक्षा अधिक दाखले दिलेल्या बांधकाम अभियंत्यांची सखोल चौकशी करावी. दोषी आढळल्यास कारवाई व्हावी. चौकशी पथकाने बोगस बांधकाम कामगारांची संख्या उघड करावी. त्यांची नोंदणी रद्द करून त्यांच्याकडून शासनाचा लाभ वसूल करावा. अशी मागणी खरे लाभार्थींनकडून केल्या गेली आहे.

. *बोगस कामगारांची रिघ*
*खरे कामगारांच्या हक्कावर गदा*
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याकडून बांधकाम कामगारांसाठी आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय, अशा विविध योजना राबविण्यात येतात त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा खरोखरच बांधकाम कामगार आहेत का? त्यांचे वय 18 ते 59 पर्यंत आहे काय? ज्यांना इंजिनियर, ठेकेदार, कात्रांटदार यांनी मान्यता नोंदणी दाखला दिला आहे.तेच अशा बांधकामगार बांधकाम कल्याणकारी कामगार सभासद होऊ शकतात .पण आज ज्यांनी कधी बांधकामा बाबद माहिती नाही,तो कामगार जिवंत आहे की नाही? बांधकाम कशाला म्हणतात ?बांधकाम म्हणजे काय? विटा कशा प्रकारे तयार होतात?वाळू चा उपयोग कशाप्रकारे केला जातो?सैकडो व्यक्ती कामगार नसूनही सुद्धा त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.खरे तर बोगस कामगार नोंदणी आज सर्वात मोठा घोटाळा आहे.बोगस प्रमाण पत्रा साठी राजकीय संघटनाचे संगनमताने काही दलाल प्रवृत्ती चे ठेकेदार एक हजार, दोन हजार रुपये घेऊन बांधकाम कामगार नोंदणी दाखले देणारे इंजिनियर, ठेकेदार, कंत्राटदार नेमले आहेत! त्यांनी तर कामगारांना कामगारांना लुटायला सुरूवात केली आहे. राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे बोगस कामगार नोंदणीला होत असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *