भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

काम आटोपून घरी परतणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक ; एक जागीच ठार एक गंभीर जखमी ▪ मालदा फाट्यावरील घटना

Summary

लाखांदूर : लाकूड कापणाऱ्या ठेकेदारासह त्याचा मजूर बारव्हा येथील आरा मशीन मालकाकडे दिलेल्या कंत्राटाचे काम झाले की नाही म्हणून पाहणी करून दुचाकीने घरी परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची […]

लाखांदूर :
लाकूड कापणाऱ्या ठेकेदारासह त्याचा मजूर बारव्हा येथील आरा मशीन मालकाकडे दिलेल्या कंत्राटाचे काम झाले की नाही म्हणून पाहणी करून दुचाकीने घरी परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे ७ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते दिघोरी मार्गावरील मालदा फाट्यावर घडली. दयवत छोटु बारसागडे (६३) रा बोंडगावदेवी असे घटनेतील मृतक इसमाचे नाव असून महादेव श्रीराम मेश्राम (४५) रा इंजोरी ता अर्जुनी मोर जि गोंदिया असे घटनेतील गंभीर जखमी इसमाचे नाव आहे.
सविस्तर असे की, घटनेतील गंभीर जखमी महादेव हे लाकूड कापणीचे काम ठेकेदारी तत्त्वावर घेतात. त्यांच्याकडे घटनेतील मृतक दयावंत मजूर म्हणून काम करतो. महादेवने कापणी केलेले लाकूड बारव्हा येथील एका आरा मशीनवर विविध वस्तू तयार करण्यासाठी दिले होते. दिलेल्या वस्तू तयार झाल्या की नाही म्हणून पाहणी करण्यासाठी महादेव व दयावंत मालकी दुचाकीने बारव्हा येथे गेले होते.
बारव्हा येथील कामकाज आटोपून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने स्वघरी जात असताना मागेहुन भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे पाहून अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती दिघोरी मोठी पोलिसांना दिली.
माहितीवरून दिघोरी मोठी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा करीत घटनेतील गंभीर जखमीला उपचारासाठी दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या महादेववर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *