भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

गोसीखुर्द डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामामुळे झालेल्या शेतपिकाची नुकसान हि गोसीखुर्द धरण प्रशासनाने स्वतःच्या हाताने केलेली नुकसान आहे रयत शेतकरी संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रकाश नाकतोडे यांचा आरोप तहसीलदार लाखांदूर यांनी कृत्रिम नुकसान दाखवावी अशी मागणी कालव्याच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे तालुक्यातील अनेक गावातील घरामध्ये पाणी कृत्रिम नुकसान न दाखविल्यास कालव्यावर अर्ध गाडुन आंदोलन करणार

Summary

लाखांदूर तालुक्यातील गोसीखुर्द डाव्या कालव्या वरून पुच्छ वितरिका, लघुकालवे, उपलघुकालव्याच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लाखांदूर तालुक्यातील बोथली, सरांडी (बु), राजनी,ओपारा,मांढळ, सावरगाव,खैरी(पट), शेतकऱ्यांच्या शेतपिकाची नुकसान गोसीखुर्द डाव्याच्या निकृष्ट दर्जाच्या व अपुर्या बांधकामामुळे होत असून हि नुकसान सबंधित विभागा कडून देण्यासाठी […]

लाखांदूर तालुक्यातील गोसीखुर्द डाव्या कालव्या वरून पुच्छ वितरिका, लघुकालवे, उपलघुकालव्याच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लाखांदूर तालुक्यातील बोथली, सरांडी (बु), राजनी,ओपारा,मांढळ, सावरगाव,खैरी(पट), शेतकऱ्यांच्या शेतपिकाची नुकसान गोसीखुर्द डाव्याच्या निकृष्ट दर्जाच्या व अपुर्या बांधकामामुळे होत असून हि नुकसान सबंधित विभागा कडून देण्यासाठी तहसीलदार लाखांदूर यांनी कृत्रिम नुकसानीचे पंचनामे करावे.
सविस्तर वृत्त असे कि,
गोसीखुर्द डावा कालवा विभागाने मुख्य डाव्या कालव्यावरुन लाखांदूर तालुक्याच्या हद्दीमध्ये पुच्छ वितरिका, लघु कालवे, उपलघुकालव्यांचे बांधकामे केली आहेत.कालव्याच्या
कामाचे अंदाज पत्रक तयार करण्यात आले. अंदाज पत्रकात
कालव्याच्या पारिवर व आतमध्ये मुरूम टाकणे,गेट जवळ सिमेंट काँक्रीटचे कामे करणे तसेच कालवे नदि नाल्यांना सोडण्याचे प्रावधान असतांना ते कंत्राटदारानी अंदाज प्रमाणे कालव्यावर मुरूम न टाकता सिमेंट काँक्रीटचे कामे न करता व कालवे नदि,नाल्यांना न सोडता अर्धवट व निकृष्ट दर्ज्याचे कामे करून गोसीखुर्द प्रशासन व कंत्राटदारानी संगनमताने बीलाची उचल करुन अपूर्ण कालवे शेतकऱ्यांच्या शेतात नेउन सोडल्यामुळे कालव्यात पाणि अडुन राहात असल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढे ही होणार आहे. सन २०१८ पासुन लाखांदूर तालुक्यातील अनेक गावामध्ये कालव्याचे पाणि वाहात येऊन कृत्रिम पुरपरिस्थीती निर्माण झाली आहे.याला कारणीभूत गोसीखुर्द डावा कालवा विभाग आहे. शेतकऱ्यांर्यांनी डावा कालवा विभाग वाही/ पवनी यांना तोंडी सुचना व लेखी तक्रारी देऊन व कालव्याच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे शेतपिकाच्या नुकसानीच्या बातम्या ५ पाच, ६ वर्षा पासून अनेक दैनिक वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होऊन सुध्दा कालव्याचे बांधकामे पूर्ण केले नाही. लाखांदूर तालुक्यातील शेतकर्यांचे धान पिके कालव्याच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सळत असतांना लाखांदूर तालुक्यातील तहसिल व कृषी विभागातील अधिकारी /कर्मचारी यांनी डावा कालवा विभाग वाही/पवनी येथील कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, साहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या मनाप्रमाणे मानव निर्मित कालव्याच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे झालेली शेतकर्यांच्या शेतपिकाची नुकसान ही अतिवृष्टीमुळे व नैसर्गिक आपत्ती मध्ये दाखवून शेतकर्यांनवर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.व करणार आहेत. तसेच महसूल व कृषी विभाग
अतिवृष्टी/नैसर्गिक आपत्ती चे खोटे पंचनामे करून शेतकर्यांची फसवणूक करित आहेत.अशा पद्धतीची शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या

महसूल व कृषी अधिकार्यांनवर कारवाई करुन कालव्यांच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतपिकाची झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे कृत्रिम नुकसान दाखवून डावा कालवा विभाग वाही/पवनी यांचे कडून नुकसान भरपाई देण्यात यावी. जोपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. तो पर्यंत नुकसान भरपाई देण्याची लेखी द्यावी. व अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामांच्या चौकशी साठी चौकशी समिती नेमावी तसेच तत्कालीन व विद्यमान दोषी अभियंत्यांनवर कार्यवाही करण्यात यावी व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.
अशी मागणी रयत शेतकरी संघटना
भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रकाश नाकतोडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *