BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

लोकशाहिचा खून करणार्या नार्वेकर चा फोटो जाळुन जोडे मारो आंदोलन

Summary

नागपूर दि ११- लोकशाहीची हत्या करणा-या विधान सभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकरच्या फोटो ला जोडे मारून व जाळून नागपूरच्या संतप्त शिवसैनिकांनी रेशिमबाग चौकात आज तिव्र निषेध केला. रेशिमबाग चौकातील शिवसेना कार्यालया समोर आज दुपारी नागपूर शहर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात […]

नागपूर दि ११- लोकशाहीची हत्या करणा-या विधान सभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकरच्या फोटो ला जोडे मारून व जाळून नागपूरच्या संतप्त शिवसैनिकांनी रेशिमबाग चौकात आज तिव्र निषेध केला.
रेशिमबाग चौकातील शिवसेना कार्यालया समोर आज दुपारी नागपूर शहर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, संतप्त शिवसैनिकांनी निंब का पत्ता कडवा है…..,५० खोके राहूल नार्वेकर ओके अश्या घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, मोदी सरकार ला येत्या निवडणुकीत यांची किंमत मोजावी लागेल असा इशारा किशोर कुमेरिया यांनी दिला.
लोकशाहीचा खून करणाऱ्या नार्वेकर याच्या फोटोला जोडे मारून जाळून निकालाचा निषेध करण्यात आला
यावेळी पदाधिकारी यांनी फोटो जाळत जोडे मारले…
सामान्य जनता हा लोकशाहिचा खून करणाऱ्या नार्वेकर यांचा निकालाचा निषेध आहे. या लोकशाही विरोधी भूमिकेला आमचा विरोध आहे. जनताच आता यांना धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया शिवसेना गटाचे नेते कीशोर कुमेरिया यांनी यावेळी दिली.
या आंदोलनात राजेश कनोजिया, अंकुश कडू, हरिभाऊ बानाईत, किशोर ठाकरे, महेंद्र कठाणे, शंकर बेलखोडे, मनोज शाहू , शारदाताई मेश्राम, मंगला राणे, शेखर खरवडे, संदिप रियाल पटेल,पुषोत्तम बन, किशोर राठोड,रोहित गौर,समित कपाटे,बबलु दरोडे,अंकित खापेकर,उमेश निकम,शाम तेलंग,विकास देशमुख,सतिश डाथरे,शब्बीर शेख,किशोर धोटे,बालु भुते,शुभम लखपती,निखील जाजुलवार,रोहन तळवडकर,राजु रुईकर, नरेन्द मरगडे,गजानन चकोले,अमित निर्मळ,श्रीकांत खंदाडे,प्रदिप तुपकर,मदन टेकाडे,मनोज जाधव,रोशन वानखेडे,राजेश बांडाबुचे,अतुल माने,अक्षय ताजने, सुखदेव डोके यांच्यासह अनेक शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *