लाच मागण्याचे आरोपातून पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल तुळजेवार यांची निर्दोष सुटका
प्रतिनिधी भंडारा
थोडक्यात हकीकत अशी की सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री महबूब खान पठाण रा. भंडारा यांनी दिनांक १६-१२-२०१५ रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल तुळजेवार यांचेविरुद्ध लेखी तक्रार दिली होती तक्रार कर्ता यांचा मुलगा इस्माईल खान व त्याचे दोन मित्र विरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे भां.द.वी. चे कलम ३६५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास आरोपी अमोल तुळजेवार यांचे कडे होता सदर गुन्ह्याचे “क” फायनल करण्याकरिता लाच रक्कम म्हणून त्यांनी रुपये ९०,००० रुपयांची मागणी केलेली आहे, अशी तक्रार त्यांचे विरुद्ध करण्यात आली होती. सदर प्रकरणात तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रवींद्र कदम यांनी अभियोग चालविण्यास मंजुरी प्रदान केली होती. प्रकरणाच्या तपासणी रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक नागपूर यांनी करून आरोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. उपरोक्त प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात आरोपी पैशाची मागणी करेल की नाही याकरिता एकूण पाच पंचनामे तपासी अधिकाऱ्याने केलेले होते. तसेच आरोपीने सदर प्रकरणात सेटलमेंट करण्याकरिता छाया देशपांडे हिला ९०,००० द्यावे लागेल असे तपासी अधिकाऱ्यांनी नमूद केले. परंतु छाया देशपांडे हिची या प्रकरणाला संमती होती का तसेच सदर प्रकरणात छाया देशपांडे हिचे बयान सुद्धा तपासी अधिकाऱ्याने नोंदविले नव्हते. सदर प्रकरणात हरीश कोकाटे यांना समझोता समझोता करण्याकरिता पैसे श्रीमती देशपांडे यांना द्यावयाचे नव्हते. त्यांना फक्त पैसे आरोपीलाच द्यायचे होते. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी झालेल्या संभाषणाची हॅशव्हॅल्यू ज्या अधिकाऱ्यांनी काढली त्या अधिकाऱ्याची सही सर्टिफिकेटवर नसणे हे या प्रकरणात फार मोठी तफावत होती. तसेच सदर प्रकरणात तक्रार करता महबूब खान पठाण याने कबूल केले की त्यांचे मुलाविरुद्धचे प्रकरण बंद करण्याकरिता आरोपीने त्यांना स्वतः करिता लाच रक्कम ९०,००० रुपये मागितली नाही. तपासी अधिकाऱ्यांनी वारंवार कसेही करून आरोपीने लाचेची मागणी करावी याकरिता सापळा रचला जेणेकरून कशाही प्रकारे आरोपी सापडला जाईल परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही. तसेच तक्रारी यांना कशाही प्रकारे आरोपीवर दबाव तंत्राचा उपयोग कराव्याच्या होता. कारण त्याचे मुलाविरुद्धचे तपास करण्याच्या अधिकार आरोपीकडे होता. या संपूर्ण घडामोडी वरून सरकारी पक्ष आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेश अस्मार साहेब यांनी आरोपी पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार यांची उपरोक्त प्रकरणातून निर्दोष सुटका केली आरोपीतर्फे एडवोकेट राजेश राऊत यांनी बचाव केला.
