BREAKING NEWS:
गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

ग्रामीण भागात महिलांनी बूथ बळकट करुण केंद्र शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवाव्या- जिल्हाध्यक्ष श्री केशवभाऊ मानकर

Summary

तिरोडा:- भारतिय जनता पार्टी महिला मोर्चा तिरोडा तर्फे आज दिनांक १९/०८/२०२१ रोज गुरुवारला भाजप कार्यालय तिरोडा येथे ग्रामीण व शहर येथील बूथवर महिलांची नेमणूक करून बळकटीकरण, संपर्क अभियान करण्यासंदर्भात महिलांची नेमणूक करण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या युगात आज महिला प्रत्येक ठिकाणी […]

तिरोडा:- भारतिय जनता पार्टी महिला मोर्चा तिरोडा तर्फे आज दिनांक १९/०८/२०२१ रोज गुरुवारला भाजप कार्यालय तिरोडा येथे ग्रामीण व शहर येथील बूथवर महिलांची नेमणूक करून बळकटीकरण, संपर्क अभियान करण्यासंदर्भात महिलांची नेमणूक करण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या युगात आज महिला प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान महत्वपूर्ण ठरत आहे याच धर्तीवर भाजप पक्षाच्या महिलांनी केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवण्याचे काम बूथ संपर्क अभियानाच्या माध्यमातून पूर्ण करावे अशे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष केशवभाऊ मानकर यांनी दिले. बूथ संपर्क अभियान बैठकीच्या वेळी ते बोलत होते.यावेळी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजयभाऊ रहांगडाले, भाजप प्रदेश सदस्य सौ.सीताबाई रहांगडाले,महिला जिल्हाध्यक्ष भावनाताई कदम,जिल्हा महामंत्री तुमेश्वरी बघेले,कु.शालिनी डोंगरे,सौ.गीताताई बडगे,जिल्हा उपाध्यक्ष सौ.रजनी कुंभरे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष एड.माधुरी रहांगडाले,भाजप तालुकाध्यक्ष श्री भाऊराव कठाने, शहर महिलाध्यक्ष सौ.राणीताई बालकोठे, शहर अध्यक्ष स्वानंद पारधी, कृउबास संचालक सौ.प्रभाताई घरजारे,विशेष निमंत्रक गायत्रीताई चौधरी,महामंत्री सौ.मेघा बिसेन,सौ.स्वाती चौधरी सौ.चंद्रकलाताई कटरे, न.प.सदस्या सौ.श्वेता मानकर,सहसंयोजक सौ.वैष्णवी सोनेवाने,रंजना धुमाळ,सौ.छायाताई नागपुरे व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सौ मेघा सुनिल बिसेन
महिला जिल्हा गोंदिया न्युज रिपोर्टर
पोलिस योद्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *