महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपाल गणरायापुढे नतमस्तक; राजभवन परिवारासोबत केली आरती

Summary

मुंबई, दि. 15 : गणेशोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या मंगलमूर्ती गणरायाचे दर्शन घेतले व सर्वांसमवेत श्रींची आरती केली. यावेळी राज्यपालांनी राजभवन परिवारातील मुला-मुलींनी सादर केलेला संगीत- नृत्य कार्यक्रम पाहिला व गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप […]

मुंबई, दि. 15 : गणेशोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या मंगलमूर्ती गणरायाचे दर्शन घेतले व सर्वांसमवेत श्रींची आरती केली.

यावेळी राज्यपालांनी राजभवन परिवारातील मुला-मुलींनी सादर केलेला संगीत- नृत्य कार्यक्रम पाहिला व गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *