BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

मंगळवेढ्यातील महिला पोलिसांशी उद्धट वर्तन, सीआयएसएफ जवानासह एकावर गुन्हा

Summary

महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणोती व पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून अंगावर धावून जाऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सीआयएसएफ जवान नेताजी रमेश आवताडे (२६) व संचिन ज्ञानेश्वर लंगडे (२०) रा.पाठखळ दोघांवर गुन्हा दाखल झाला त्याना ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्याद महीला […]

महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणोती व पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून अंगावर धावून जाऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सीआयएसएफ जवान नेताजी रमेश आवताडे (२६) व संचिन ज्ञानेश्वर लंगडे (२०) रा.पाठखळ दोघांवर गुन्हा दाखल झाला त्याना ताब्यात घेण्यात आले आहे.

फिर्याद महीला पोलीस उपनिरीक्षक प्रणोती रघुनाथ यादव यांनी दिली.कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणोती यादव व कर्मचारी पो.ना घुले, पोकॉ शिंदे,दरदरे हे सांगोला नाका येथे विनामास्क लोकांवर कारवाई करीत होते.

दरम्यान शनिवारी सव्वा पाचच्या सुमाराला मोटरसायकलवरून (एम एच १३ – डीपी २२३२) वरील दोघानी मला तुम्ही आडविणारे कोण ? असे म्हणून आरेरावीची भाषा वापरली.

कायदेशीर दंड भरा असे सांगितल्यावर पोलिसांच्या अंगावर आले.

सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *