जि. प. प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे चाईल्ड से दोस्ती सप्ताह साजरा करण्यात आला
पोंभूर्णा उमरी पोतदार :-
आधुनिक भारताचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती निमित्त बालक दिन साजरा करीत असतो. आणि त्यानिमित्त *चाईल्ड लाईन से दोस्ती* या उपक्रमा अंतर्गत चाईल्ड लाईन १०९८ याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ० ते १८ वर्ष वयोगटातील अनाथ बालके, निवाऱ्याच्या शोधात असणारे बालके, भिक्षेकरी, बालकामगार, एकपाल्य बालके तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके आढळल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले.
सदर उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांमद्ये वातावरण निर्मिती करून कृतीगीत आणि खेळ, स्पर्धात्मक खेळ, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, मार्गदर्शन खेळ घेण्यात आली. तसेच यास्पर्धे मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास कोपरा बनविण्याचे आव्हाहन करण्यात आले.
चाईल्ड लाईन से दोस्ती या उपक्रमात उपस्थित जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सतीश कदम सर, सुशील गव्हारे सर, टोंगे सर तसेच चाईल्ड लाईन चंद्रपूरचे केंद्र समन्वयक अभिषेक मोहुर्ले समुपदेशका दिपाली मसराम टीम मेंबर प्रणाली इंदुरकर, कल्पना फुलझेले, किरण बोहरा, प्रदीप वैरागडे, अंकुश उराडे, अक्षय ढोरेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश उराडे तर आभाप्रदर्शन दिपाली मसराम यांनी केले.