BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 30कोटींचा निधी परतीच्या मार्गावर

Summary

चंद्रपूर : शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेला निधी खर्च करण्यासाठी मार्च महिन्यात सर्वच विभागांकडून मोठी घाई सुरू असते. ही कामे एप्रिल व मे महिन्यातही सुरू राहतात. जुन्या तारखांमध्ये कागदोपत्री व्यवहार केले जातात. ही नियमबाह्य पद्धत अनेक वर्षांपासून सुरूच आहे. त्यातच अनेक […]

चंद्रपूर : शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेला निधी खर्च करण्यासाठी मार्च महिन्यात सर्वच विभागांकडून मोठी घाई सुरू असते. ही कामे एप्रिल व मे महिन्यातही सुरू राहतात. जुन्या तारखांमध्ये कागदोपत्री व्यवहार केले जातात. ही नियमबाह्य पद्धत अनेक वर्षांपासून सुरूच आहे.

त्यातच अनेक कामे पदाधिकारी व सदस्यांच्यामर्जीतील कंत्राटदारांचीच राहातअसल्याने याकडे कानाडोळा केला जातो, अशी चर्चा आहे.२०१९-२० मध्ये जिल्हा परिषदेला मिळालेला निधी खर्चकरण्याची ३१ मार्च २०२१ ही अंतिम तारीख आहे. या निधीतून आरोग्य, महिला व बालकल्याण विभागात सर्वाधिक कामे होणार आहेत.

मार्च अखेर कामे जुन्या तारखांची अदलाबदल करून काही पदाधिकारी सदस्यांच्या मर्जीतील व कंत्राटदारांकडून पुढील नवीन आर्थिक वर्षात एक ते दोन महिन्यांपर्यंत सुरूच राहतात.

मात्र, काँग्रेसच्या जि. प. गटनेत्याने नुकतेच मुख्य वित्त व लेखा अधिकार्यांकडे पत्र पाठवून २०२०-२१ मधील १२ विभागांना प्राप्त निधी व १ एप्रिल २०२१ पर्यंतच्या खर्चाची माहिती मागितली. त्यामुळे नियमबाह्य कामे केल्याचा ठपका बसेल, या भीतीमुळे कामे झाली नाही तर सुमारे ३० कोटींचा निधी यंदा परत जाण्याची शक्यता आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *