*गुजरी व शुक्रवारी बाजार दुकानदाराकडुन बाजार कर वसुली त्वरीत बंद करा* कन्हान शहर विकास मंच चे मुख्याधिकारी बन्नोरे ना निवेदन.

*नागपुर* कन्हान : – शहारात दररोज लागणा-या गुजरी बाजार व शुक्रवारी आठवडी बाजारात भाजीपाला व इतर सा मान विकण्या-या गरीब दुकानदारा कडुन बाजार कर वसुली करण्यात येत असल्याने भाजीपाला व इतर दु कानदार चांगलेच अडचणीत असल्याने कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांचा नेतृत्वात नगर परिषद मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे ना शिष्टमंडळ भेटु न या विषयावर चर्चा करून गुजरी व शुक्रवारी बाजार गरीब दुकानदारांकडुन बाजार कर वसुली त्वरीत बंद करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे.
नगरपिषद कन्हान-पिपरी द्वारे गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजाराची हक्काची स्थायी जागा दुकानदारांना दुकाने लावण्यास सोयी सुविधा सह म्हणजे औटे, पिण्याच्या पाण्याची, वाहने उभी करण्या स जागा, शौचालय, स्वच्छता गृहाची व्यवस्था, कचरा पेटी आदी समुचित आवश्यक व्यवस्था न केल्याने दर रोज गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजार राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर व नगराच्या रस्त्यावरच लागतो. या नागपुर-जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गवर मोठे -मोठ्या वाहनाची चांगलीच वर्दळ असुन वाहतुकीस अडथळा होत वाहन चालकांना तारेवरची कसरत करा वी लागत असल्याने अपघाताची दाट शक्यता असते. अनेकदा अपघात होऊन निष्पाप लोक बळी पडतात. राष्ट्रीय महामार्गावरच गुजरी व आठवडी बाजार भरत असल्याने छोटे मोठे दुकानदारांना व नागरिकांना जिव मुठीत घेऊन भाजीपाला व इतर सामानाची विक्री, खरे दी करावी लागत असताना सुध्दा नगरपरिषद कन्हान -पिपरी प्रशासनाने गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजाराचा कर वसुलीचा ठेका देऊन जबरन दररोज भाजीपाला व इतर दुकाने उदरनिर्वाहाचे साधन म्हणुन लावणा-या गरिब,गरजु दुकानदाराकडुन बाजार कर वसुल करण्यात येत असल्याने दुकानदार चांगलेच अडचणीत सापडले असल्याने कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या नेतुत्वात मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन गंभीर विषयावर चर्चा करून नगरपरिषद प्रशासनाने त्वरीत उपाय योजना करून जोपर्यंत गुजरी बाजर व शुक्रवारी आठवडी बाजाराला सुरक्षित जागा व सोयीसुविधा पुरविल्या जात नाही तो पर्यंत गुजरी बाजार व शुक्रवारी आठवडी बाजारात भाजीपाला व इतर दुकाने लावणा-या गरीब दुकानदा रांकडुन बाजार कर वसुली करणे त्वरीत बंद करण्यात यावी. अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे. शिष्टमंडळात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, हरीओम प्रकाश नारायण, सुषमा मस्के, वैशाली खंडार, पौर्णिमा दुबे, नितिन मेश्राम, माधव वैद्य, संजय रंगारी, मोरेश्वर चकोले, रंणजीत बाबु , प्रकाश कुर्वे, अखिलेश मेश्राम, शाहरुख खान, सोनु खोब्रागडे सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
संजय निबाळकर
उपसंपादक
पोलिस योध्दा न्यूज नेटवर्क
9158239147